स्‍टुअर्ट डग्लस यांच्या ‘Shuggie Bain’ला यंदाचं 'Booker Prize'

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 20 November 2020

अवनी दोशी यांच्या  ‘Burnt Sugar’  या कादंबरीशी ‘Shuggie Bain’ बरोबर स्पर्धा होती. त्यात शेवटी डग्लस यांनी बाजी मारली आहे. अंतिम सहा स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीत ‘Shuggie Bain’ ने परिक्षकांची पसंती मिळवली आहे.

मुंबई - साहित्य जगतात मानाचा समजल्या जाणा-या बुकर प्राईजची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साहित्य रसिकांना याबद्दल उत्सुकता होती. अखेर त्याची घोषणा करण्यात आली आहे. यात दुबईतील भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोशी यांना मागे टाकत ‘Shuggie Bain’ चे लेखक कादंबरीकार स्‍टुअर्ट डग्लस यांनी यावेळच्या बुकर प्राईजवर आपले नाव कोरले आहे.

अवनी दोशी यांच्या  ‘Burnt Sugar’  या कादंबरीशी ‘Shuggie Bain’ बरोबर स्पर्धा होती. त्यात शेवटी डग्लस यांनी बाजी मारली आहे. अंतिम सहा स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीत ‘Shuggie Bain’ ने परिक्षकांची पसंती मिळवली आहे. याविषयीची अधिकृत घोषणा जजिंग पॅनलच्या अध्यक्ष मार्गारेट बुस्बी यांनी केली.

न्युयॉर्कचे विजेते लेखक डग्लस स्टुअर्ट म्हणाले,  माझ्या कादंबरीची निवड झाली आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. माझ्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. ‘Shuggie Bain’ ही माझी कादंबरीचे स्वरुप हे काल्पनिक आहे. मात्र त्यावर पुस्तक लिहिणं हा माझ्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. 44 वर्षीय डग्लस यांनी हा कादंबरी आपल्या आईला समर्पित केली आहे. 

अमृता फडणवीस यांचे ' तिला जगु द्या' व्हायरल, 42 हजार डिसलाईक

आई गेली त्यावेळी डग्लस हे 16 वर्षांचे होते. त्यांनी पुढे लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट मधून पदवी प्राप्त केली. त्य़ानंतर फॅशन डिझायनिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय पक्का झाल्यानंतर ते न्युयॉर्कमध्ये गेले. त्यांनी केल्विन क्लेन, राल्फ लॉरेन आणि गॅप सारख्या वेगवेगळ्या ब्रँडसाठी काम केले आहे.

हे ही वाचा: ‘दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली’ म्हणत अभिनेता विराजस कुलकर्णाने शेअर केला कोरोना काळातील अनुभव    

गेल्या दशकभरापूर्वी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. दुबईस्थित असणा-य़ा भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोशी  ‘Burnt Sugar’ बरोबर त्यांची मुख्य स्पर्धा होती. अंतिम सहा लेखकांमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र दोशी यांना शेवटच्या टप्प्यात डग्लस यांच्या ‘Shuggie Bain’ कडून पराभव स्वीकारावा लागला.

कोरोनामुळे यंदा या पुरस्काराची प्रक्रिया ही ऑनलाईन पार पडली. 2020 मधील बुकर प्राईज जजिंग पॅनलच्या अध्यक्ष आणि संपादक, साहित्यिक मार्गारेट बुस्बी यांनी याबाबतची अधिकृत माहिती सोशल मीडियातून दिली आहे. नेहमी मोठ्या स्वरुपात होणारा हा पुरस्कार सोहळा यंदा कोरोनामुळे छोट्या स्वरुपात करण्यात आला. यावेळी अनेकांनी झुम मिटींगव्दारे त्यात सहभाग घेतला. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Douglas Stuarts Shuggie Bain is the winner of the 2020 Booker Prize