esakal | 'चोक्ड'मधील अभिनेत्री क्रिकेटवेडी, पाहा EXCLUSIVE मुलाखत
sakal

बोलून बातमी शोधा

Choked Actress saiyami kher interviewed by sunandan lele

नुकत्याच नेटफ्लिक्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चोक: पैसा बोलता हैं , हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या चित्रपटातील सुंदर अभिनेत्री सैयामी खेर यांची सुनंदन लेले यांनी सकाळसाठी विशेष मुलाखत घेतली.

'चोक्ड'मधील अभिनेत्री क्रिकेटवेडी, पाहा EXCLUSIVE मुलाखत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 09 : नुकत्याच नेटफ्लिक्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चोक: पैसा बोलता हैं , हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या चित्रपटातील सुंदर अभिनेत्री सैयामी खेर यांच्याशी सुनंदन लेले यांनी सकाळसाठी विशेष मुलाखत घेतली. एका मध्यमवर्गीय गृहीणीची कथा असलेला चोक्ड हा चित्रपट आहे. नोटबंदीमुळे तिचं जीवन कसं बदलतं यावर यामध्ये भाष्य करण्यात आलंय. बेरोजगार असलेला पती आणि त्याला कशाप्रकारे साथ देते याचंही चित्रण यामध्ये कऱण्यात आलं आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा सगळीकडे होत असून सैयामीच्या अभिनयाचं कौतुकही केलं जात आहे.

उषा किरण यांची नात असलेली सैयामी हिने आजीसोबतच्या आठवणीही शेअर केल्या. सैयामीनं तिच्या क्रिकेटवेडाबद्दलही या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं क्रिकेटच्या भाषेतचं दिली आहेत. पहिला चित्रपट मिर्झ्या फ्लॉप झाल्यानंतरची चार वर्षे बरेच चढ उतार अनुभवल्याचं तिने सांगितलं. 

पदार्पणातच मोठ्या दिग्दर्शकासोबत काम केलं. चित्रपटाला यश मिळालं नसलं तरी त्यानंतरचे चार वर्षे बाऊन्सी आणि ग्रीन विकेटवर खेळावं लागेल. आता चोक्डनंतर फ्लॅट ट्रॅक मिळतील. पाटा विकेट मिळेल खेळायला असंही मत तिनं व्यक्त केलं. लहानपणापासून खेळाची आवड आहे. सोशल मीडियावरही खेळत असलेले फोटो व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यावरून लोकांनी खेळण्याचा सल्लाही दिला. पण प्रत्यक्षात सातत्यानं खेळणं सोपं नाही. या खेळाचा नक्कीच मला फायदा होतो.

सेहवागसारखी फटकेबाजी करायला आवडले असते, पण..द्रविड यांच्या मनातीलं गोष्ट

प्रमुख भूमिका करायला मिळाली याबद्दल सैयामी स्वत:ला नशिबवान समजते. ती म्हणाली की, अनुराग कश्यप यांनी दाखवलेल्या विश्वासासाठी आभार. कलाकाराच्या आयुष्यात असा चित्रपट खूप उशिरा मिळतो पण मला ही संधी लवकर मिळाली. राकेश ओमप्रकाश मेहरा, निरज पांडे, अनुराग कश्यप यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळाली. या तिघांसोबतच्या कामाचा अनुभवही तिने सांगितला.

मुंबईतील अंडरवर्ल्डचे जग पुन्हा वेबमालिकेतून उलगडणार; 'बॉम्बे डे' वेबसीरीज लवकरच भेटीला...

खेळाची आवड असलेली सैयामी म्हणते की, फिटनेसची आवड आहे पण सध्या फिटनेसचं फॅड वाढलं आहे. ते याआधी इतकं नव्हतं. आता फिटनेसकडं लोक लक्ष देत आहेत तर ते चांगलंच आहे. फिजिकली फिटनेस तुम्हाला मानसिकदृष्ट्याही सक्षम व्हायला मदत करतो.

#वर्णभेदाचा_खेळ : तिच्या उदरातील बाळावरही झाली होती विकृत टिपण्णी

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं सैयामीचा एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ती एका गली क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना दिसत होती. चोक्ड चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सचिनने फोटो शेअर करताना म्हटलं होतं की, एक फ्रेंड फक्त अॅक्टिंगच नाही तर फलंदाजीही करू शकते. चोक्डमध्ये तुझा अभिनय आवडला अशा शब्दात कौतुक केलं होतं. यावर सैयामीनं सचिनंच आभार मानलं होतं. सचिनकडून कौतुक म्हणजे खेलरत्न आणि ऑस्कर एकत्रच मिळाल्यासारखं आहे असं ती म्हणाली होती.