
कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये रेमो डिसूजाची पत्नी लिजेलसोबत आहे. रेमोबाबतची ही माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.
मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आल्याचा माहिती समोर येत आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये रेमो डिसूजाची पत्नी लिजेलसोबत आहे. रेमोबाबतची ही माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.
हे ही वाचा: ऐतिहासिक घटनेवर आधारित 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' सिनेमाचं पोस्टर रिलीज
मिळालेल्या माहितीनुसार, रेमो डिसुजाला दुपारी हृदयविकाराचा झटका आला होता. उत्कष्ट कोरिओग्राफीसाठी प्रसिद्ध असलेल्या रेमो डिसुजाला फालतू आणि एबीसीडी सारख्या सिनेमांसाठी ओळखलं जातं. तो स्वतः डान्स ऍकॅडमी देखील चालवतो जिथे दरवर्षी युवा डांसर्सना प्रशिक्षण दिलं जातं. २ एप्रिल १९७२ मध्ये बंगळुरुमध्ये रेमोचा जन्म झाला. रेमो त्याच्या शालेय दिवसात एक उत्कुष्ट ऍथलेट होता. आणि त्यावेळी त्याने अनेक पुरस्कार देखील मिळवले होते. रेमोचं लग्न लिजेलसोबत झालं. लिजेल कॉस्च्युम डिझायनर आहे. रेमोला दोन मुलं असून त्यांच नाव ध्रुव आणि गबिरिल आहे.