
फराहने एक ओपन लेटर सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, वयाच्या 43 व्या वर्षी आपल्याला आई व्हावं लागलं. मात्र हा प्रवास काही सोपा नव्हता.
मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान सोशल मीडियावर चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. ती तिच्या पर्सनल लाईफशी संबंधित गोष्टी सोशलाईज करण्यासाठीही प्रसिध्द आहे. तिनं वयाच्या 43 व्या वर्षी लग्न केलं. मात्र त्यानंतर तिला काही बदलांचा सामना करावा लागला. त्याविषयी आलेल्या अनुभवांविषयी तिची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
फराहने एक ओपन लेटर सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, वयाच्या 43 व्या वर्षी आपल्याला आई व्हावं लागलं. मात्र हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अवघड परिस्थिती होती. अपत्य हवे असण्यासाठी IVF च्या मदतीने आई होण्याच्या निर्णय घ्यावा लागला.
त्याविषयी अधिक माहिती देताना फराह म्हणते, पत्नी आणि आई म्हणून मला अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि या निवड करण्याच्या स्वातंत्र्यातूनच मी कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माती झाले. ज्यावेळी मला जाणवते, की योग्य वेळ आहे, त्यावेळी मी माझ्या मनाचे ऐकले आणि निवड केली, मग ते माझे करियर असो, किंवा कुटुंब. आपण लोक काय म्हणतील याचा खूप जास्त विचार करतो. जे चालले आहे ते आपले जीवन आहे आणि निर्णय आपला असला पाहिजे हे आपण विसरतो.
सैफ अली खानची वेबसिरीज 'दिल्ली'चं नाव बदललं, 'या' नावाने होणार रिलीज
फराहला अन्या, कजार आणि डीवा ही तीन मुले आहेत. तिघेही आता 12 वर्षांचे आहेत. तिने वयाच्या 43 व्या वर्षी IVF च्या मदतीने आई होण्याचा निर्णय घेतला होता तिघेही आता 12 वर्षांची झाले आहेत. फराहने मातृत्व मिळवण्याबाबत एक ओपन लेटर लिहिले आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. IVF च्या माध्यमातून मातृत्व मिळवण्याचा विषय मांडणार्या सोनी एन्टरटेन्मेन्ट टेलिव्हिजनवरील 'स्टोरी 9 मंथ्स की' या मालिकेचे देखील तिने कौतुक केले आहे.
हे ही वाचा: 'लग्नात जाण्यासाठी टॉप ५० मध्ये येणं जरुरी', सुनील ग्रोवरचं मजेशीर ट्विट
विज्ञानाच्या प्रगतीमुळे या वयातही IVF च्या साहाय्याने मी आई होऊ शकले. सध्या महिला लोकं काय म्हणतील याचा फारसा विचार करताना दिसत नाहीत. त्यांची मानसिकता बदलते आहे हे पाहून आनंद होतो असल्याची भावना फराहने यावेळी व्यक्त केली.