Chowk Movie Review : 'चौका-चौका'तील तरुणाईची लक्षवेधक कथा सांगणारा चित्रपट!

एका चौकात घडलेली ही घटना त्यानंतर भयंकर वळण घेते. चौकातील या तरुणाईचे भांडण पराकोटीला जाते. त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते.
 Chowk Movie Review
Chowk Movie Review esakal

Chowk Movie Review : राजकीय पुढाऱ्यांची सुंदोपसुदी, त्यात भरकटली जाणारी चौका-चौकातील तरुणाई, त्यांची विचार करण्याच्या पद्धती आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्याचा त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा परिणाम....याचे लक्षवेधक चित्रण म्हणजे चौक हा चित्रपट. रेगे, बबन, सरसेनापती हंबीरराव अशा काही चित्रपटांमध्ये अभिनयाची यशस्वी इनिंग खेळणाऱ्या देवेंद्र गायकवाडने चौक हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

दिग्दर्शनाबरोबरच कथा-पटकथा व संवाद त्यानेच लिहिली आहेत. या सगळ्याच बाबतीत त्याने चौकार आणि षटकार लगावलेले आहेत. कथानकाची उत्तम मांडणी, कलाकारांचा लाजबाब अभिनय, खणखणीत तजेलदार असे संवाद या बाबी या चित्रपटाच्या जमेच्या आहेत. या चित्रपटाची कथा सुरू होते पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकीपासून. या मिरवणुकीत दोन गटांमध्ये बाचाबाची होते.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

या भांडणामध्ये नगरसेवकाचा भाऊ बाल्या (अक्षय टांकसाळे) याच्या कानशिलात लगावली जाते. साहजिकच त्याचा अहंकार दुखावला जातो. मग बाल्याचे गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष (शुभंकर एकबोटे) आणि त्याचा जीवलग मित्र सनी (किरण गायकवाड) यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण होते. त्यातच बाल्या आपल्या दोस्ती ग्रुपमधून सनीला काढून टाकतो. मग त्यांच्यातील हा द्वेष पराकोटीला जातो. सर्वसामान्य कुटुंबातील ही तरुण मंडळी एकमेकांचा गळा कापण्यास सुरुवात करतात.

एका चौकात घडलेली ही घटना त्यानंतर भयंकर वळण घेते. चौकातील या तरुणाईचे भांडण पराकोटीला जाते. त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते. स्थानिक पुढारी अण्णा (प्रवीण तरडे) व नगरसेवक टायगर (उपेंद्र लिमये) या तरुणाईला आपले प्यादे बनवितात आणि मग एकच जीवघेणा खेळ सुरू होतो.

 Chowk Movie Review
Kangana Ranaut : 'माझ्यामुळे बॉलीवूडमध्ये आज...' कंगनानं तोडले अकलेचे तारे!

दिग्दर्शक देवेंद्र गायकवाडने एका चौोकातील ही कथा मांडली असली तरी ती बरेच काही सांगणारी आहे. प्रत्येक प्रसंगाची मांडणी त्याने अत्यंत कुशलतेने केली आहे. चौकातील तरुणाई, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्याच्यातील मैत्री, त्यांच्यातील दुश्मनी, या दुश्मनीचा त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम, स्थानिक पुढाऱ्यांचा त्याच्यातील सहभाग वगैरे बाबी दिग्दर्शकाने पडद्यावर छान टिपल्या आहेत.

 Chowk Movie Review
Kerala Tour: तुम्हाला ही केरळच्या निसर्ग सौंदर्यात हरवायचं आहे? मग या ठिकाणांना नक्की भेट द्याच ...

देवेंद्र हा एक उत्तम आणि कल्पक दिग्दर्शक आहे याची प्रचीती हा चित्रपट पाहात असताना वारंवार येते. या चित्रपटाचे संवाददेखील त्यानेच लिहिले आहेत आणि खणखणीत व प्रसंगानुरूप समर्पक असेच ते झाले आहेत. प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, अक्षय टांकसाळे, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, संस्कृती बालगुडे, रमेश परदेशी आदी कलाकारांनी आपल्या अभिनयाने चार चांद लावलेले आहेत.

 Chowk Movie Review
Nawazuddin Siddhiqui :'त्यांच्यासोबत जेवायला बसलो म्हणून बाहेर काढलं, काय चूक होती माझी?'

या सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला असला तरी अधिक कौतुक करावे लागेल ते शुभंकर एकबोटे, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये या कलाकारांचे. त्यांनी आपल्या भूमिकेतील बारकावे छान पडद्यावर टिपले आहेत. अण्णा आणि टायगरची भेदक नजर, त्यांची रणनीती आणि त्यातील विविध डावपेच प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांनी पडद्यावर छान रेखाटले आहेत. त्यांच्या तोंडी असलेले संवाद खणखणीत आहेत.

या चित्रपटातील जाळ जाळ...हे गाणे अगोरदरच लोकप्रिय ठरलेले आहे. त्याची कोरिओग्राफी उमेश जाधव यांनी उत्तम केली आहे. मयूर हरदास यांची सिनेमॅटोग्राफी बोलकी झाली आहे. चौक आणि त्या परिसरातील विविध दृश्ये त्यांच्या कॅमेऱ्यात छान बंदिस्त झाली आहेत. तरीही काही गोष्टी खटकणाऱ्या आहेतच. चित्रपट अधेमधे काहीसा सैल झाल्यासारखा वाटतो. तेव्हा दिग्दर्शकाची चित्रपटारील पकड सुटते की काय असे वाटत असतनाच चित्रपट छान गती घेतो आणि ही सगळी कमाल दिग्दर्शकाची आहे.

 Chowk Movie Review
Zara Hatke Zara Bachke Twitter Review: क्या बोलती पब्लिक! पहायचा की नाय विकी-साराचा जरा हटके जरा बचके! ट्विटर रिव्हू म्हणतोय,...

दिग्दर्शकाच्या कल्पक बुद्धीची आहे. कारण चौका-चौकातील ही गोष्ट मांडताना कथेचा पोत कुठे हरवणार नाही याची काळजी त्याने पुरेपूर घेतली आहे. म्हणूनच चौका-चौकातील तरुणाईची ही गोष्ट लक्षवेधक आहे. तालुका असो की जिल्हा गाव असो की एखादी वाडी प्रत्येक ठिकाणी चौक हा असतोच. त्या चौकातील तरुणाईची ही कथा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com