Zara Hatke Zara Bachke Twitter Review: क्या बोलती पब्लिक! पहायचा की नाय विकी-साराचा जरा हटके जरा बचके! ट्विटर रिव्हू म्हणतोय,...

Zara Hatke Zara Bachke Twitter Review
Zara Hatke Zara Bachke Twitter ReviewEsakal

सारा अली खान आणि विकी कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट 2 जून म्हणजेच आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्ददर्शन केले आहे. दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे.

विकी साराचे चाहते या चित्रपटाची अतिशय उत्सूकतेने वाट पहात होते. आता या चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही चाहत्यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली आहे.

एकीकडे लोक विकी कौशल आणि सारा अली खानची जोडी पसंत करत आहेत. तर काही जरा हटके जरा बचके चित्रपटाच्या कथेमुळे खुप भावुक देखील झाले आहे. तर काहींनी हा चित्रपट निव्वळ टाईमपास वाटला आहे. अशा प्रकारे या चित्रपटाला समिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.

Zara Hatke Zara Bachke Twitter Review
Tiger 3 Video: क्या बात है.. टायगर ३ च्या सेटवर एकत्र दिसले शाहरुख - सलमान, फॅन्सकडून एकच जल्लोष

पहिल्या भागात विकी प्रेक्षकांचं मन जिंकतो तर दुसऱ्या भागात सारा अली खान चा ह्यूमर आणि सर्व पात्रांची भावनिक दृश्ये प्रेक्षकांच्या मनाला भिडतं.

चित्रपटात फक्त 'जरा जरा' काम केले. सारा आणि विकीचे सीन अप्रतिम आहेत. कोणीतरी साराला स्क्रीनवर कसं रडायचं ते शिकवा. विकी कौशलनं उत्तम अभिनय केला. कथा प्रेडिक्टेबल आहे आणि थोडीशी ताणली आहे.

Zara Hatke Zara Bachke Twitter Review
Sapna Choudhary: फॅन म्हणावा की भक्त ? सपना चौधरीचे पाय धुवून प्यायला पाणी! व्हिडिओ तुफान व्हायरल..

जरा हटके जरा बचकेवर ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका मीडिया वापरकर्त्याने लिहिले, जरा हटके जरा बचके हे सर्व आहे की तुम्ही घर खरेदी करण्यासाठी किती दूर जाऊ शकता - व्यावहारिक आणि मनोरंजक पद्धतीने स्पष्ट केले आहे.

विकी कौशल आणि सारा अली खानची भुमिका प्रभावी आणि विशेषतः कॉमिक भागांमध्ये त्यांचे सर्वोत्तम अभिनय केले. कथा खूपच भावनिक आहे,

Zara Hatke Zara Bachke Twitter Review
Scoop Web Series: 'माझ्या प्रतिमेचा गैरवापर..'गँगस्टर छोटा राजनने केली 'स्कूप' या वेबसिरीज बंदीची मागणी..काय आहे नेमकं प्रकरण

जरा हटके जरा बचके हा विकी कौशल आणि सारा अली खान अभिनीत रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात जवळपास 1500 स्क्रीन्सवर रिलीज होण्यास तयार आहे.

दुसरीकडे, अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर, त्याची संख्या चांगली आहे. 40 करोडच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट ओपनिंग डे ला बॉक्स ऑफिसवर 8 ते 9 करोडचा कमाई करेल असा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com