Sunny Deol: बापाचं फारच कौतुक! मात्र बॉलीवुड Script Writer अन् Directorवर केलं मोठं विधान... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunny Deol: Appreciates father Dharmendra stardom

Sunny Deol: बापाचं फारच कौतुक! मात्र बॉलीवुड Script Writer अन् Directorवर केलं मोठं विधान...

Sunny Deol: बॉलीवुडला अनेक हिट चित्रपट देणारा अॅक्शन बॉय सनी देओल लवकरच त्याच्या चुप या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनीचे वडील धर्मेंद्र यांनीही बॉलीवुडला एवरग्रीन चित्रपट दिले आहेत. आपल्या वडिलांसारखं बॉलीवुडमध्ये कोणी नाही. ते सर्वगुणसंपन्न आहेत असं कायम सनीला वाटत असतं. सनीने त्यांच्या वडिलांबाबत मोठं विधान करत त्यांचं मनभरून कौतुक केलंय. ( Appreciates father Dharmendra stardom)

सनीच्या फिल्मी कारकिर्दीचा आदर्श त्याने त्याच्या वडिलांकडूनच घेतला असं तो कायम सांगत असतो. वडिलांची स्तुती करताना तो म्हणतो, 'माझे वडील सर्वच पात्रांत काम करणारे एवमेव अभिनेते आहेत. त्यांनी कुठलीही भूमिका करण्यास कधी नाही म्हटले नाही. चुपके चुपके, शोले, प्रतिज्ञा, फुल और पत्थर यांसारख्या चित्रपटांत त्यानी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. मला अनेकदा असं वाटतं की मीही माझ्या वडीलांच्या काळात अॅक्टिव्ह असतो तर फार छान झालं असतं.'

माध्यमांशी बोलताना सनीने बॉलीवुडमधील आजच्या स्क्रिप्ट रायटर आणि डायरेक्टर्सवर मोठं विधान केलंय. त्या काळी लेखक आणि दिग्दर्शकांची चित्रपटांतील भावनांवर मजबूत पकड होती. मात्र आजच्या चित्रपटांत त्या भावना लुप्त झाल्या आहेत. चित्रपटांतील त्यांच्या वडिलांचा प्रवास सांगताना तो म्हणाला की, माझे वडील एका दिवशी अनेक चित्रपटांच्या शुटिंगला जायचे. त्याकाळचे लेखक आणि डायरेक्टरही तेवढेच चांगले होते.

हेही वाचा: Sunny Deol ने उपचारांसाठी गाठली अमेरिका, काय झालं अभिनेत्याला? चाहते चिंतेत

सनी पुढे म्हणतो, त्या काळी लिहिलेल्या स्क्रिप्टही नसायच्या, सगळं काही कथानकांवर आधारित असायचं. आजच्या कलाकारांकडे बाऊंड स्क्रिप्ट असते तरीही ते मागे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं मी माझ्या वडिलांच्या काळात या क्षेत्रात असायला हवं होतं. माहितीसाठी सनीचा चुप हा चित्रपट २३ सप्टेंबरला रिलीड होणार आहे. हा चित्रपट आर बाल्की निर्देशित आहे.

Web Title: Chup Actor Sunny Deol Appreciate His Father Dhramendra Stradom And Given A Big Statement On Bollywood Writer And Director

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..