Prasad Oak: मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसाद ओकची भेट घेऊन केलं अभिनंदन! कारण ठरलं खास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसाद ओकची भेट घेऊन त्याचं अभिनंदन केलंय
cm eknath shinde congratulate actor prasad oak for his new home dharmaveer 2
cm eknath shinde congratulate actor prasad oak for his new home dharmaveer 2SAKAL

CM Shinde - Prasad Oak: सध्या अभिनेता प्रसाद ओक चांगलाच चर्चेत आहे. प्रसादला आपण आजवर अनेक सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. प्रसाद सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करतोय. याशिवाय तो धर्मवीर 2 चं शूटींग करत आहे.

धर्मवीर सिनेमाच्या निमित्ताने प्रसादचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी घनिष्ट संबंध निर्माण झाले. अशातच नुकतीच मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसाद ओकची भेट घेतलीय. कारणही खास ठरलंय.

cm eknath shinde congratulate actor prasad oak for his new home dharmaveer 2
Ole Aale Review: नाना पाटेकरांचा बहुचर्चित 'ओले आले' चांगला की वाईट? वाचा हा रिव्ह्यू

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली प्रसादची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसाद ओकची भेट घेतलीय. कारणही खास ठरलंय. प्रसाद ओकने नवीन वर्षाच्या मुहुर्तावर नवीन घरात प्रवेश केलाय. त्यानिमित्ताने प्रसादचं अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसादची भेट घेतलीय.

या भेटीविषयी अभिनेता - निर्माता मंगेश देसाई लिहीतो, "घराचं स्वप्न आपण सहज बघू शकतो, पण ते पूर्ण होण्यासाठी खूप कष्ट ,चिकाटी आणि "असंच घर पाहिजे ही महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे ".

मंगेश पुढे लिहीतो, "प्रसाद तू आणि मंजूने ती ठेवलीस आणि स्वप्न पूर्ण झालं .
माझ्या,शलाका आणि साहिल कडून तुझे अभिनंदन .मा .मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच मेहेनत करणाऱ्या आणि कलाकारांच्या पाठीशी असतातच. तुझ्या विनंतीला मान देऊन साहेब घरी आले आणि तुला शुभेच्छा दिल्या .अजून काय केलं ते तू सांग.आपल्या सगळ्यांकडून त्यांचे आभार. जयहिंद जय महाराष्ट्र.. तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

या पोस्टवर प्रसादने मंगेशला सांगितलं की, "आपला प्रवास एकत्रच सुरु झाला… दुसऱ्या शहरातून मुंबईत येऊन या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी आपण काय काय केलंय ते तू चांगलंच जाणतोस… त्यामुळे या प्रवासाचे आपण एकत्र साक्षीदार आहोत…!!!
तू आमच्या आनंदात सहभागी झालास… खूप खूप भारी वाटलं मित्रा…!!!"

अशाप्रकारे मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसादची सहकुटुंब भेट घेऊन त्याचं अभिनंदन केलंय. प्रसाद सध्या आगामी महापरिनिर्वाण, धर्मवीर 2, रीलस्टार या सिनेमांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com