Cocktail 2 : 'तुम ही हो बंधु, सखा तुम ही...' 'कॉकटेल २' मध्ये सैफ-दीपिका नव्हे तर 'या' कलाकारांना मिळणार संधी?

Not Saif-Deepika but 'these' actors will get a chance in 'Cocktail 2' : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या कॉकटेल चित्रपटानं धमाल उडवून दिली होती.
Cocktail 2 Saif Ali Khan Deepika Padukone celebrity
Cocktail 2 Saif Ali Khan Deepika Padukone celebrity esakal

Cocktail 2 Saif Ali Khan Deepika Padukone celebrity : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या कॉकटेल चित्रपटानं धमाल उडवून दिली होती. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं मोठी कमाईही केली होती. कॉकटेल बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान आणि दीपीकाच्या कॉकटेल चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र त्यामध्ये सैफ, दीपिका आणि डायना दिसणार नाहीत असेही बोलले जात आहे. त्याऐवजी दुसऱ्याच कलाकारांना संधी मिळाल्याची चर्चा आहे. ते कलाकार आहेत तरी कोण याविषयी जाणून घेऊ.

2013 मध्ये आलेल्या कॉकटेल चित्रपटामध्ये एका वेगळ्या विषयाची मांडणी करुन सैफ अन दीपिकाच्या अभिनयानं चाहत्यांची पसंती मिळवली होती. अशातच गेल्या काही दिवसांपासून कॉकटेल २ ची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार दीपिका, सैफ आणि डायना पेंटी हे कॉकटेल २ चा भाग असणार नाहीत.

इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार, कॉकटेल २ साठी सारा अली खान आणि अनन्या पांडेला कास्ट करण्यात आले आहे. याबाबत सारा आणि अनन्याकडून कोणत्याही प्रकारे या माहितीला दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यांनी याबाबत कोणताही खुलासाही केलेला नाही. प्रॉडक्शन हाऊसकडून देखील याविषयी कोणतेही स्टेटमेंट समोर आलेले नाही. मात्र त्या दोन्ही सेलिब्रेटींनी मॅडडॉक फिल्मसच्या ऑफिसच्या बाहेर स्पॉट केले गेले आणि त्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

Cocktail 2 Saif Ali Khan Deepika Padukone celebrity
Fighter Day 7 Box Office : सात दिवसांत कमावले 140 कोटी, 'फायटर' सुसाट पण...!

दीपिका, सैफ आणि डायना या सेलिब्रेटींची कॉकटेल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ३५ कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं त्यावेळी १२६ कोटींची कमाई केल्याचे दिसून आले होते. सैफ, दीपिकाशिवाय त्या चित्रपटामध्ये डिंपल कपाडिया, बोमन इराणी, टीना देसाई आणि रणदीप हुडा यांच्या भूमिका होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com