Fighter Day 7 Box Office : सात दिवसांत कमावले 140 कोटी, 'फायटर' सुसाट पण...!

प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या फायटर चित्रपटानं दमदार सुरुवात केली होती. मात्र सातव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.
Fighter Box Office One Week Collection
Fighter Box Office One Week Collectionesakal

Fighter Box Office One Week Collection - प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या फायटर चित्रपटानं दमदार सुरुवात केली होती. मात्र सातव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. भलेही जगभरातून या चित्रपटानं दोनशे कोटींपेक्षा अधिक कमाई केली असेल पण सध्या बॉक्स ऑफिसवर फायटरचं विमान डगमगताना दिसत आहे.

फायटरच्या निमित्तानं हृतिक रोशन अन् दीपिका हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर करताना दिसत आहेत. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र सध्या त्याच्या कमाईच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास दिवसागणिक हा चित्रपट बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या आकड्यात खाली येताना दिसतो आहे. डीएनएनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

डोमेस्टिक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारचे कलेक्शन हे कमी झाले आहे. एका आठवड्यात या चित्रपटानं किती डोमेस्टिक कलेक्शन केले याविषयी माहिती घेऊयात. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं २४ कोटींची कमाई केली होती. दीपिका आणि हृतिकचा चित्रपट म्हटल्यावर ज्या पद्धतीची ओपनिंग हवी होती तशी ती मिळाली नसल्याचे चित्रपट समीक्षकांचे म्हणणे आहे. यानंतर पुढील तीन दिवसांत मात्र फायटर चांगलाच जोर पकडला होता.

पुढील तीन दिवसांत फायटरनं तब्बल शंभर कोटींची कमाई केली आहे. भारतातून दोनशे कोटींची कमाई करण्यासाठी फायटरला धडपड करावी लागत आहे. मंगळवारी या चित्रपटानं पावणे आठ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर बुधवारी या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे दिसून आले. सातव्या दिवशी केवळ ६.३५ कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

कसे आहे फायटरचे कलेक्शन...

भारतातून नेट कलेक्शन - १४०.३५ कोटी

ग्रॉस कलेक्शन - १६०.८ कोटी

बुधवारचे कलेक्शन - ६.३५ कोटींची कमाई

सिद्धार्थ आनंद यांच्या फायटरमध्ये हृतिक आणि दीपिका यांच्याशिवाय अनिल कपूर, अक्षय ऑबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर, संजीदा शेख यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. आगामी काळात फायटरला दोनशे कोटींपर्यत पोहचण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार असे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com