राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांनी सोडली आशा

श्रीवास्तव यांच्या मेंदूला सूज आल्यानं मेंदूचं कार्य बंद पडल्याचं सांगितलं जात आहे.
raju srivastav
raju srivastav sakal
Updated on

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची चिंता सध्या सगळ्या देशाला लागून राहिली आहे. देशातून त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याच्या आशा सोडल्याची माहिती मिळत आहे.

raju srivastav
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, हृदयासोबत मेंदूलाही धोका..

मात्र श्रीवास्तव यांच्या परिवाराने अद्याप आशा सोडलेली नाही. ते एक योद्धा आहे, ते लवकरच बरे होतील, असा विश्वास श्रीवास्तव यांच्या परिवाराने व्यक्त केला आहे. राजू श्रीवास्तव सध्या दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण त्यांच्या प्रकृतीत खास सुधारणा दिसत नाही.

raju srivastav
'The King of Comedy' म्हणून ओळखले जातात राजू श्रीवास्तव

सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या वॉर्डमध्ये किंवा मजल्यावरही अगदी जवळच्या नातेवाईकांशिवाय कोणालाही सोडलं जात नाही. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूचं कार्य बंद पडल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या मेंदूला सूज आल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com