राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, हृदयासोबत मेंदूलाही धोका..

Raju shrivastav Health Update: 43 तास उलटूनही राजू यांच्या तब्येतीत सुधारणा नाही. उलट परिस्थिती अधिक चिंताजनक..
Raju Srivastava health update: Comedian suffered brain damage after heart attack, still on ventilator
Raju Srivastava health update: Comedian suffered brain damage after heart attack, still on ventilatorsakal

Raju Srivastava health update: सध्या संपूर्ण भारत देश प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. कारण त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. बुधवारी त्यांना हृदयविकारचा झटका आला. तेव्हापासून ते दिल्लीतील AIIMS रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता ४३ तास उलटून गेले तरी अद्याप ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक असून आता त्यांच्या हृदयासोबत मेंदूला धोका वाढला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यावर तब्येतील सुधारणा व्हावी यसाठो डॉक्टरांची संपूर्ण टीम पूर्ण प्रयत्न करत आहेत. (Raju Srivastava health update: Comedian suffered brain damage after heart attack, still on ventilator)


राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. जिममध्ये वर्कआऊट करताना श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनंतर त्यांची एन्जॉग्राफी आणि एन्जॉप्लास्टी करण्यात आली. परंतु राजू सध्या कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. काल त्यांच्या मुलीनेही सर्वांना अपील केले होते. ती म्हणाली होती की, 'त्यांना आता औषधांची नाही तर प्रार्थनेची गरज आहे.' पण आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

काही वेळासाठी राजू यांची प्रकृती सुधारली होती. परंतु ती सुधारणा फारवेल टिकली नाही. त्यांचा रक्तदाब अद्यापही स्थिर नाही. त्यांची बीपी पुन्हा कमी-जास्त होत आहे. त्यामुळे आता त्यांच्या हृदया सोबतच मेंदूची स्थितीही नाजुक आहे. त्यांचा मेंदूही उपचारांना प्रतिसाद देत नाहीय. त्यामुळे एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे. डॉक्टार म्हणाले की, साधरण एन्जॉप्लास्टी नंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होते परंतु 43 तास उलटूनही राजू यांच्या तब्येत कोणताही बदल नाही. सध्या कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर, गॅस्ट्रोलॉजी टीम, न्यूरोलॉजी अशा डॉक्टरांच्या विविध तुकड्या राजू यांच्यावर उपचार करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com