Raju Shrivastav Son: बाप तसा बेटा! राजू श्रीवास्तवच्या मुलाने लूटली सा रे ग म प ची मैफिल | ESakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raju shrivastav son, ayushman shrivastav, raju shrivastav, ayushman shrivastav performance

Raju Srivastav Son: बाप तसा बेटा! राजू श्रीवास्तवच्या मुलाने लूटली सा रे ग म प ची मैफिल

Raju Shirvastav Son: काही महिन्यांपूर्वी अभिनेता, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. राजू यांनी त्यांच्या कॉमेडीने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं. राजू यांच्या जाण्याची पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. आता राजू यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगाही मनोरंजन क्षेत्रात स्वतःचा जम बसवत आहे. त्याच नाव आयुष्यमान श्रीवास्तव. आयुष्यमानने नुकतंच सा रे ग म प लिटिल चॅम्प्स च्या मंचावर त्याच्या स्वरांची जादू दाखवली.

(comedian raju-srivastav-son-aayushmaan-srivastav-is-played-sitar-in-sa-re-ga-ma-pa-little-champs)

हेही वाचा: Raju Srivastav Birth Anniversary: जातानाही हसवून गेला.. असा विनोदवीर होणे नाही..

आयुष्मान एक उत्कृष्ट सितार वादक आहे. हळूहळू तो संगीत क्षेत्रातील आपली पकड मजबूत करत आहेत. आयुष्मान व्यावसायिक रित्या त्याच्या सितार वादनाचे अनेक कार्यक्रम करत असतो. अलीकडेच लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम शो सा रे ग मा प लिल चॅम्प्स 9 च्या फिनालेमध्ये त्याने सितार वादन करून लोकांना चकित केले. आयुष्मान हळुहळु इंडस्ट्रीत पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्मानचा हा खास व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर केलाय.

हेही वाचा: Pathaan: शाहरुख - सलमान पठाण मध्ये एकत्र, व्हिडिओ व्हायरल

फोटो शेअर करताना आयुष्मान श्रीवास्तवने कॅप्शनमध्ये लिहिले की, सा रे ग मा पा च्या ग्रँड फिनालेमध्ये मी सितार वाजवली. श्रीवास्तव कुटुंबीयांनीही राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत पेजवरून हा फोटो शेअर केला आहे. अंतिम फेरीतील धनेश्वरी गाडगेच्या गायनावर आयुष्मानने आपल्या सितारवादनाने चार चाँद लावले आहेत. आयुषमानच्या परफॉर्मन्सने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

आयुष्मानने लहानपणापासूनच संगीत क्षेत्रात प्रवेश केला होता. राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या मुलांचा नेहमीच अभिमान वाटत आलाय. अगदी कमी वयात आयुष्यमानने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर संगीतक्षेत्रात स्वतःच नाव निर्माण केलंय. आज राजू श्रीवास्तव असते तर त्यांना आपल्या मुलाचा कायम अभिमान वाटला असता

दरम्यान ट्रेडमिलवर धावता धावता राजू खाली कोसळले. त्यांना हदयविकाराचा झटका आलेला. डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. राजू अनेक दिवस क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत होते. परंतु २१ सप्टेंबर २०२२ ला राजु श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला. राजू यांचा वारसा संगीताच्या माध्यमातून त्यांचा मुलगा आयुष्यमान पुढे घेऊन जात आहे