esakal | 21 कॉमेडियन घालणार 'कॉमेडीचा राडा'
sakal

बोलून बातमी शोधा

comedycha raada

या शोमध्ये 10 एपिसोड असून त्यात एकूण 21 उदयोन्मुख कॉमेडियन प्रेक्षकांना भिडतील

21 कॉमेडियन घालणार 'कॉमेडीचा राडा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- मराठी भाषेतील स्टँडअप कॉमेडीचा समावेश असलेल्या 'कॉमेडीचा राडा' शोचा शुभारंभ झाला आहे..या शोमध्ये 10 एपिसोड असून त्यात एकूण 21 उदयोन्मुख कॉमेडियन प्रेक्षकांना भिडतील अशा ताज्या, समकालीन वैविध्यपूर्ण विषयांवरील ऍक्ट सादर करणार असून त्यांत उपहास, सामान्य जीवनातील प्रसंग, अमूर्त विषय आणि अन्य अनेक विषयांचा समावेश असेल. अष्टपैलू मराठी अभिनेता प्रणव रावराणे याचं सूत्रसंचालन लाभलेला ‘कॉमेडीचा राडा’ ही कॅफेमराठीची निर्मिती आणि कलाकृती आहे.

lockdown: शाहरुखने केली ट्रोलर्सची बोलती बंद, ही पहा मदतीची भलीमोठी यादी

आजपासून सुरू होणारा हा शो 'हंगामा प्ले' या हंगामाच्या व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. याशिवाय व्होडाफोन प्ले, आयडिया मूव्हीज एँड टीव्ही, एअरटेल एक्स्ट्रीम ऍप, ऍमेझॉन फायर टीव्ही स्टिक, टाटा स्काय बिंज, एमएक्स प्लेयर आणि अँड्रॉइड टीव्हींवरही उपलब्ध असेल. त्याचबरोबर हंगामाच्या शाओमीबरोबरच्या सहयोगामुळे हा शो ग्राहकांना हंगामा प्लेच्या माध्यमातून मी टीव्हीवरही पाहता येईल.

या शोमधील कामगिरीबद्दल प्रणव रावराणे म्हणाला, “मी या शोचा होस्ट आहे याचा मला आनंद आहे. महाराष्ट्रात प्रचंड गुणवत्ता असून हंगामा प्ले आणि कॅफे मराठीसारखे प्लॅटफॉर्म प्रादेशिक विनोदवीरांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येत आहेत, ही फार दिलासादायक बाब आहे. मला या शोमध्ये काम करताना जेवढा आनंद झाला, तेवढाच आनंद प्रेक्षकांना तो पाहताना मिळेल, याची मला खात्री आहे.”

रामदास टेकाळे, निशांत अजबेले, साईश गोटेकर, आकाश खेडकर, अक्षय कोकणे, चिरंतन लोणकर, स्वप्नील जाधव, योगेश खेडकर, मंदार पाटील, स्पंदन आंबेकर, तेजस घाडीगावकर, किशोर साळुंके, श्रीराम पारवे, प्रशांत वाकोडे, विनय नाटेकर, सुकेशिनी वाघमारे, प्रशांत मनोरे, सचिन भिलारे, आनंद कुलकर्णी, विलास पांचाळ आणि आदित्य सावंत या विनोदवीरांनी कॉमेडीचा राडामध्ये सहभाग घेतला आहे.

comedycha raada a marathi stand up comedy original lauch

loading image