महेश मांजरेकरांवर शिवसैनिक संतापले;थेट मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार

पत्राद्वारे केली ''नाय वरणभात लोंच्या,कोन नाय कोंच्या" सिनेमावर बंदी आणण्याची मागणी
Mahesh Manjrekar's ''Naay Varanbhaat Lonchya,Kon Naay Konchya'' Movie Poster
Mahesh Manjrekar's ''Naay Varanbhaat Lonchya,Kon Naay Konchya'' Movie PosterGoogle

महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) म्हणजे वास्तवदर्शी सिनेमे दाखवण्यात ज्यांचा हातखंडा आहे असे दिग्दर्शक. केवळ मराठीत नाही तर बॉलीवूडमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवणारे मराठी दिग्दर्शक. संजय दत्तला घेऊन केलेला 'वास्तव' असो की तब्बू सारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीसोबत केलेला त्यांचा सिनेमा 'अस्तित्व' असो,मराठीतला माईलस्टोन ठरलेला त्यांचा 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' सिनेमा असो की मुंबईतल्या मिलवाल्यांचं खरं आयुष्य,त्यांची झालेली फरफट अगदी 'लालबाग परळ' सिनेमातून थेट पडद्यावर दाखवण्याचं त्यांनी केलेलं धाडस असो....त्यांनी आतापर्यंत केलेल्या प्रत्येक सिनेमाला वास्तवाची धार होती. ती बोचरी असली तरी ते विदारक सत्य समोर आणण्याच्या त्यांच्या धाडसाला खरंच सलाम. पण आता त्यांच्या एका सिनेमामुळे मात्र समाजात विरोधाचे सूर उमटलेले ऐकायला मिळत आहेत. त्या सिनेमाचं नाव आहे ''नाय वरणभात लोंच्या,कोन नाय कोंच्या".

Mahesh Manjrekar's ''Naay Varanbhaat Lonchya,Kon Naay Konchya'' Movie Poster
बिग बॉसच्या घरात पुन्हा तांडव

या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अनं सुरुवातीला महिला आयोगानं तक्रारीचा सूर ओढला. नेमकं असं काय दाखवलंय सिनेमात की त्यामुळे हा विरोध केला जातोय. आपल्याला जर आठवत असेल तर मांजरेकरांच्या 'लालबाग परळ' या सिनेमात मिलवाल्यांची फरफट,त्यांचं आयुष्य दाखवण्यात आलं होतं. पण त्याहीपुढे एक पाऊल या नवीन सिनेमात मांजरेकरांनी टाकलंय म्हणायचं. यात त्यांनी मिल कामगारांच्या पुढच्या पिढीची दयनीय अवस्था दाखवली आहे. त्यातनं त्यांच्या लहान मुलांची बिघडलेली मनोवृत्ती,विकृती याचं थेट चित्रण केलं आहे. त्यातनं अनेक सीन्स असे आहेत जे लहान मुलांवर चित्रित केलेले आहेत आणि कदाचित आजपर्यंत मराठी सिनेमातनं ते कधी पाहिलं गेलं नसेल. अश्लील सीनचा भडीमार,रक्तपात,लहान मुलांच्या तोंडी अर्वाच्य भाष असं अगदी मराठी अस्मितेला न शोभणारं असं चित्रण करण्यात आलय. ते कदाचित सत्य असेलही पण मराठी सिनेमाला किंवा मग प्रेक्षकांना कदाचित त्या सत्याचा सामना करायची सवय आतापर्यंत नव्हती.

Mahesh Manjrekar
Mahesh ManjrekarGoogle

समाजातील अनेक स्तरातून विरोध दर्शवल्यावर मांजरेकरांनी एक पाऊल मागे टाकत ट्रेलर सोशल मीडियावरनं काढून टाकण्याचं आश्वासन दिलं. पण तेवढ्यावर विरोधक समाधानी नाहीत. आतापर्यंत केवळ महिला आयोगानं विरोध केला होता पण आता शिवसैनिकांनीही सिनेमाविरोधात तक्रारीचा सूर ओढला आहे. तशी रीतसर तक्रार थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आली आहे. या पत्रात महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा' या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. अजिता जानावळे या युवा शिवसैनिक असलेल्या तरुणीनं हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. यात तिनं म्हटलंय,''मांजरेकरांच्या या सिनेमामुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होणार आहे. सध्या ऑनलाइन क्लासेसमुळे मुलांच्या हातात स्मार्ट फोन असतो त्यामुळे हा ट्रेलर किंवा सिनेमाही मुलांकडून पाहिला जाऊ शकतो. आणि ज्या सिनेमात लहान मुलांसोबतची अश्लील दृश्य,काकी या नात्याची केलेली विटंबना,अर्वाच्य भाषा वापरली आहे यामुळे निश्चितच लहान मुलांसाठी हे धोक्याचं ठरू शकतं.यामुळे लवकरच सिनेमावर बंदी आणावी'' अशा स्वरुपाची मागणी तीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आता पहायचं मुख्यमंत्री या विषयात मध्यस्थी करून काय तोडगा काढतायत ते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com