
Alia Bhatt: आलियाच्या गुड न्यूजनंतर कंडोम कंपनीची अफलातून पोस्ट, म्हणाले..
alia bhatt pregnancy : आलिया भट्टने(Alia Bhatt) सोमवारी २७ जून,२०२२ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नेंसीची (Pregnancy) बातमी जाहिर केली. इन्स्टाग्रामवर आलियानं एक फोटो शेअर केला आहे,ज्यात ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली आहे आणि तिच्या शेजारी पाठमोरा रणबीर कपूर (ranbir kapoor) बसला आहे. आणि दोघेही समोर असलेल्या अल्ट्रासाऊन्ड मशिनच्या मॉनिटरकडे एकटक पहात आहेत. या फोटो नंतर आता चर्चाना उधाण आले आहे. यात सर्वात कामाल केली ते एका कंडोम कंपनीने.. आलिया आणि रणबीर साठी त्यांनी एक पोस्ट केली आहे. (Alia Bhatt, Ranbir Kapoor announce pregnancy) ( Condom brand hilarious post about Ranbir Kapoor-Alia Bhatt pregnancy ) (alia bhatt pregnancy)
हेही वाचा: हा शरद पोंक्षे तुच ना? शिंदे समर्थनावरुन आदेश बांदेकर संतापले, केली पोलखोल
'महफिल में तेरी हम तो क्लिअरली नहीं थे' अशी पोस्ट या कंपनीने केली आहे. रणबीरच्याच एका सुपरहिट गाण्याच्या ओळी बदलून एकदम भन्नाट पद्धतीने या कंडोम कंपनीने आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. ही कंपनी कायमच असे वेगवगेळे गमतीशीर पोस्ट शेयर करत असते.
विशेष म्हणजे आलिया आणि रणबीरच्या लग्नावेळी ही या कंपनीने अशीच पोस्ट शेयर केली होती. आलिया आणि रणबीर च्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी या कंपनीने त्यांना शुभेच्छा देत पोस्ट केले होते की, 'महफिल में तेरी हम ना रहे जो फन तो नही है' अशी गमतीशीर पोस्ट त्यांनी केली होती. आणि आता आलियाला दिवस गेल्यावर अगदी विरुद्ध पण खुमासदार पोस्ट या कंपनीने पोस्ट केली आहे.
Web Title: Condom Brand Hilarious Post About Ranbir Kapoor Alia Bhatt Pregnancy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..