esakal | 'अनुपमा' वर संकट, मालिकेतील आणखी दोघींना कोरोनाची लागण 

बोलून बातमी शोधा

 anupama tv serial news

अल्पना बुच आणि निधी शाह यांच्याशिवाय आतापर्यत या मालिकेतील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

'अनुपमा' वर संकट, मालिकेतील आणखी दोघींना कोरोनाची लागण 
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय असणा-या अनुपमा मालिकेतील कलाकारांना कोरोनानं आपल्या जाळ्य़ात ओढलं आहे. आता आणखी दोन कलाकारांना कोरोना झाल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. मालिकेच्या सेटवर कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. यापूर्वी अभिनेत्री तसनीम शेख नंतर आता अल्पना बुच आणि निधी शाहला कोरोना झाला आहे. मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी ही माहिती सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. आता अल्पना बुच आणि निधी शाह क्वॉरनटाईन केलं आहे.

अल्पना बुच आणि निधी शाह यांच्याशिवाय आतापर्यत या मालिकेतील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय प्रॉडक्शन विभागातील काही जणांना कोरोना झाल्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र अजून मालिकेचे चित्रिकरण थांबवण्यात आलेले नाही. अनेक कलाकार घरातूनच काम करत असल्याची माहिती आहे. कोरोनाचा कहर असाच सुरु राहिला तर काही काळ मालिकेचे चित्रिकरण थांबवावे लागेल अशी शक्यता आहे.

याविषयी अधिक माहिती देताना अनुपमा मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी सांगितले की, अल्पना आणि निधी हे आमच्या मालिकेचा एक महत्वाचा भाग आहे. त्या दोघींचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. ज्यावेळी त्या दोघींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसायला सुरुवात झाली त्यांना आम्ही वैद्यकीय सल्ला घेण्यास सांगितले. सध्या मालिकेशी संबंधित सर्व कलाकारांना क्वॉरनटाईन करण्यात आले आहे. तसेच मुंबई महापालिकेलाही त्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आता सर्वजण आपआपली काळजी घेत आहेत. त्यांनी त्यांच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.