
एका जोडप्याने शेतामध्ये 'मैने प्यार किया' या चित्रपटामधील 'दिल दिवाना...' या गाण्यामधील 'दुनिया मांगी अपनी मुरादी, मै तो मांगू साजन...’ या कडव्यावर नृत्य केले आहे.
पुणे: एका जोडप्याने शेतामध्ये 'मैने प्यार किया' या चित्रपटामधील 'दिल दिवाना...' या गाण्यामधील 'दुनिया मांगी अपनी मुरादी, मै तो मांगू साजन...’ या कडव्यावर नृत्य केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दोघांच्या नृत्यावर कोणीही हसू नये, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
'मैने प्यार किया' या चित्रपटाचा चाहता वर्ग मोठा आहे. या चित्रपटामधील गाणी आजही ऐकली जातात. एका जो़डप्याने शेतामध्ये 'दिल दिवाना...' या गाण्यावर नृत्य केले आहे. शिवाय, नृत्यादरम्यान या जोडप्याने सलमान खान आणि भाग्यश्रीसारखेच कपडे घातले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यावर हजारो प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. कृपया त्यांच्यावर कोणीही हसू नये. त्यांनी खूप छान नृत्य केले असून, त्यांचे प्रेम दिसत आहे. अभिनेत्री रविना टंडन हिने हा व्हिडीओ पाहिला असून, ट्विटरवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे की, 'मी सोशल मीडियावर पाहिलेला सर्वात क्यूट व्हिडीओ.'
दरम्यान, लाखो नेटिझन्सनी या जोडप्याचे कौतुक केले आहे. परंतु, हे दांपत्याने हा व्हिडिओ कोठे व कधी शुट केला आहे, याबद्दलची माहिती मिळू शकली नाही.
Hahaha this is the sweetest video on the net that I’ve seen today ???? https://t.co/zrZ2evID7a
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 13, 2019