
मुंबई- कोरोना व्हायरसचं थैमान संपूर्ण देशभरात सुरुच आहे. सामान्य माणसांसोबतंच सेलिब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. बी-टाऊनमधील बच्चन कुटुंबियातील सदस्य पॉझिटीव्ह आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. त्याआधी अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षारक्षक देखील पॉझिटीव्ह आल्याने त्यांचा मुंबईतील बंगला सील करण्यात आला होता. आज रेखा यांनी देखील स्वतःची कोरोना टेस्ट केली होती.
अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षा रक्षक पॉझिटीव्ह आल्याने त्यांचा मुंबईतील बंगला सील करण्यात आला होता. सुरक्षा रक्षकासोबतंच रेखा यांच्या घरातील दोन कर्मचारी देखील पॉझिटीव्ह आले आहेत. त्यानंतर आता रेखा यांनी देखील आज सोमवार रोजी स्वतःची कोरोना टेस्ट करुन घेतली. मात्र रेखा यांना सध्यातरी कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी सोमवारी रेखा यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. तसंच त्यांना घराबाहेर न पडण्याची सूचनाही देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
रेखा यांच्यात कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत मात्र यापुढच्या काही दिवसात लक्षणे आढळल्यास त्यांची पुन्हा एकदा टेस्ट करण्यात येईल अशी माहितीही समोर येत आहे. ११ जुलै रोजी रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा बंगला बीएमसीने सील केला होता.
बॉलीवूडमध्ये बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच इंडस्ट्री हादरली. अमिताभ यांच्यासोबत ३ जणांची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या बंगल्यातील कर्मचा-यांची कोरोना टेस्ट देखील करण्यात आली होती. या २६ कर्मचा-यांचे रिपोर्टही निगेटीव्ह आलेले आहेत. त्यांना देखील होम क्वारंटाईन राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
रेखा यांचा बंगला बांद्रा येथे बँडस्टँड भागात आहे. त्यांच्या घराच्या सुरक्षेसाठी नेहमी २ सुरक्षा रक्षक तैनात असल्याचं कळतंय. त्यापैक एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या त्याच्यावर बांद्रा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. बीएमसीकडून रेखा यांचा बंगला देखील सॅनिटाईज करण्यात आला असून नोटीसवर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
covid 19 bmc home quarantine stamp on actress rekhas hand
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.