esakal | बॉलिवूडमध्ये शिरला कोरोना : रेखा यांचे निवासस्थान सील, तर बिग बी, ज्युनिअर बच्चन पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 positive bollywood abhishek amitabh bachchan rekha

महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. तर, अभिनेत्री रेखा यांचे निवासस्थान असलेली इमारत सील करण्यात आलीय. एकाच दिवशी दोन मोठ्या घटना घडल्यामुळं बॉलीवूड हादरलंय.

बॉलिवूडमध्ये शिरला कोरोना : रेखा यांचे निवासस्थान सील, तर बिग बी, ज्युनिअर बच्चन पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सूरज यादव

मुंबई : मुंबईत कोरोनाचा उद्रेक कमी झाला असला तरी, आता कोरोनानं बॉलिवूडमध्ये शिरकाव केलाय. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. तर, अभिनेत्री रेखा यांचे निवासस्थान असलेली इमारत सील करण्यात आलीय. एकाच दिवशी दोन मोठ्या घटना घडल्यामुळं बॉलीवूड हादरलंय. यापूर्वी करण जोहरच्या निवासस्थानी काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लगण झाली होती. तर इतरही काही कलाकारांच्या घरातील कर्मचारी, कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. पण, बॉलिवूडमधील बड्या कलाकारांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, बच्चन कुटुंबियांत अमिताभ आणि अभिषेक वगळता इतरांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलाय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही बच्चन कुटुंबात अमिताभ आणि अभिषेक वगळता इतरांचे अहवाल निगेटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.

अभिषेक बच्चनलासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक बच्चनने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. अभिषेकने ट्विटरवर म्हटलं की, वडिलांसह माझीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे असून रुग्णालयात दाखल झालो आहेत. आम्ही आवश्यक त्या सर्वांना याची माहिती दिली असून कुटुंबिय आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. कोणीही अस्वस्थ होऊ नका आणि शांत रहा असं आवाहन अभिषेकने केलं आहे. 

हे वाचा - अभिषेकचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ऐश्वर्या आणि जया बच्चन निगेटिव्ह

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात असून त्यांना सहकार्य करत आहे असंही अभिषेक बच्चनने म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटवरून याची माहिती दिली होती.

बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात हलवलं आहे. कुटुंबीयासह इतरांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत.अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. तसंच गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करावी असंही त्यांनी सांगितलं आहे. 

हे वाचा - कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस दिलेल्या महिलेनं 16 आठवड्यांनी शेअर केला अनुभव

दरम्यान दुसरीकडे आजचा दिवस बॉलिवूडला धक्का देणारा असाच ठरला. बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यावरील सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा बंगला सील कऱण्यात आला. त्यांच्या बांद्रा इथल्या बंगल्याचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. रेखा यांची कोरोना टेस्ट केली आहे की नाही याबाबत मात्र अद्याप समजू शकले नाही.