
Shubhman Gill: ना सारा अली खान..ना सारा तेंडुलकर शुभमन गिलच्या मनात भलतीच कुणीतरी.. म्हणाला,'मला तर..'.
Shubhman Gill: क्रिकेटर आणि बॉलीवूड सेलिब्रिटींच्या जोड्या जुळणं हे काही आपल्यासाठी नवं नाही. इंडस्ट्रीत असे काही स्टार्स आहेत ज्यांनी क्रिकेटरशी लग्न केलंय तर इथं क्रिकेटरशी अफेअर्स तर ढीगभर झालेले आहेत. आता या सगळ्या नावांची पु्न्हा उजळणी करत बसण्यापेक्षा थेट मुद्द्यावर येऊ या.
तर गेल्या काही महिन्यांपासून सारा अली खान आणि शुभभन गिलच्या डेटिंगच्या बातम्या आपल्या कानावर पडत आहेत. दोघांचे एकत्रित डिनर फोटो देखील आपल्या समोर आले.
अर्थात दोघांनीही अद्याप यावर बोलणं टाळलं असल्यानं त्यांच्या चाहत्यांच्या मनात अजूनही याविषयी संभ्रम आहेच. पण तितक्यात आता शुभमन गिलनं आणखी एक मोठा खुलासा करत चाहत्यांचा संभ्रम वाढवला आहे.(Cricketer Shubhman Gill reveal his crush)
शुभमन गिलचं नाव सारा अली खान आधी सारा तेंडुलकरसोबतही जोडलं गेलं होतं. त्याचं काही होत नाही तोवर त्याचं नाव सारा अली खान सोबत जोडलं गेलं. दोघांचे एक-दोन फोटो समोर आले पण त्यातलं सत्य काही कळेना तोवर आता शुभमन गिलनं एका कार्यक्रमात एका अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा करत अनेकांना पुन्हा एकदा पेचात पाडलं.
एका कार्यक्रमात त्याला जेव्हा विचारलं गेलं की तुझं क्रश कोण आहे? तेव्हा त्यानं रश्मिका मंदाना हे नाव घेतलं आणि चर्चेचा सूरच बदलला.
हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
शुभमन गिलनं सुरुवातीला तर क्रश कोण विचारल्यावर प्रश्न टाळायचा खूप प्रयत्न केला. त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये हसला..प्रश्नाचा सूर बदलण्याचा प्रयत्न केला.
पण मुलाखतकार ऐकेना म्हटल्यावर शेवटी रश्मिकाचं नाव घेत त्यानं सर्वांनाच हैराण करून सोडलं. अद्याप यावर 'पुष्पा' फेम रश्मिका मंदानानं कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
पण आता सोशल मीडियावर मात्र शुभमन गिलसोबत रश्मिकाचं नावही जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.