भूमिकेसाठी शारीरिक संबंधाची मागणी; मराठी अभिनेत्रीने दाखल केली FIR

'सहकुटुंब सहपरिवार' मालिका पुन्हा एकदा चर्चेत
Swapnil Lokhande, Swati Bhadave
Swapnil Lokhande, Swati Bhadave

अभिनेत्री अन्नपूर्ण विठ्ठल यांनी सहकलाकार आणि दिग्दर्शकांवर मानसिक छळ केल्याचा, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केल्यापासून 'सहकुटुंब सहपरिवार' Sahkutumb Sahaparivar ही मालिका चर्चेत आहे. आता आणखी एका अभिनेत्रीने मालिकेच्या प्रॉडक्शन कंट्रोलरविरोधात एफआयआर दाखल केली आहे. अभिनेत्री स्वाती भादवेनं Swati Bhadave गोरेगाव पोलिस ठाण्यात स्वप्निल लोखंडेविरोधात एफआयआर दाखल केली आहे. 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत स्वातीने स्वप्निलविरोधात धक्कादायक आरोप केले आहेत. संपूर्ण करिअरमध्ये असा अनुभव कधीच आला नव्हता, असंदेखील ती म्हणाली.

आरोपांबद्दल स्वातीने सांगितलं, "सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत मी नंदिता पाटकरच्या बॉडी डबलचं काम करत होते. मी इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून काम करतेय. पण फक्त या मालिकेसाठी मी बॉडी डबलचं काम करण्यास तयार झाले. नंदिता सेटवर नसायची किंवा तिला उशिरा होत असल्यास मी तिची भूमिका साकारायची. एकेदिवशी स्वप्निल लोखंडेनं माझा फोन नंबर मागितला. त्यानंतर त्याने मला पुण्यात काम करण्यास तयार आहे का, असं विचारलं. मी त्याला हो म्हटलं. त्याबदल्यात त्याने माझ्याकडे मोबदला मागितला. मी कमिशन देण्यास तयार होती. पण त्याला वेगळंच काहीतरी हवं होतं. त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते आणि मी होकार दिल्यास तो मला आणखी भूमिका देणार होता. हे ऐकून मला धक्काच बसला."

Swapnil Lokhande, Swati Bhadave
'मिस केरळ'च्या मृत्यूचं गूढ उकललं; 'त्या' रात्री पार्टीनंतर नेमकं काय घडलं?

"गेल्या अनेक वर्षांपासून मी या इंडस्ट्रीत काम करतेय. मी क्राईम पेट्रोलमध्येही काम केलं. हिंदी मालिका आणि मराठीतील फुलाला सुगंध मातीचा, जिजामाता यांमध्येही भूमिका साकारल्या. पण असा अनुभव मला कधीच आला नव्हता. मी याविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे", असं तिने पुढे सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com