Cuttputlli Movie: 'कॉपी तरी नीट करायची!' नेटकऱ्यांनी अक्षयला पुन्हा झाडलं|Cuttputlli Akshay Kumar Movie actor trolled copied | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cuttputlli plagiarised

Cuttputlli Movie: 'कॉपी तरी नीट करायची!' नेटकऱ्यांनी अक्षयला पुन्हा झाडलं

Cuttputlli plagiarised: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. प्रेक्षकांशी पंगा घेणं, चाहत्यांना गृहित धरणं किती महागात पडू शकतं याचा अनुभव त्यानं त्याच्या रक्षाबंधन (Bollywood News) चित्रपटाच्या निमित्तानं घेतला आहे. सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलीवूडबरोबरच बॉयकॉट रक्षाबंधन असाही ट्रेंड सुरु होता. असे दिसून (Viral Social Media News) आले होते. त्यामुळे अक्षयच्या या चित्रपटाला आतापर्यतचं सर्वात कमी ओपनिंग मिळालं होतं. या चित्रपटाला वीस कोटींची कमाई करताना नाकीनऊ आल्याचे दिसून आले. यासगळ्यात त्याचा कटपुतली नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्यावरुन तो ट्रोल होतो आहे.

नेटकऱ्यांना अक्षयच्या तो अंदाज काही आवडलेला नाही. त्याच्या कटपुतली या चित्रपटामध्ये त्यानं भुवन बामच्या एका व्हिडिओतील संवाद कॉपी करुन आपल्या चित्रपटामध्ये घेतल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अक्षयला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. कमीत कमी कॉपी तरी बरोबर करायची अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्याला दिल्या जात आहे. दुसरीकडे आपण जेव्हा एखाद्याची कॉपी करतो तेव्ही ती प्रेक्षकांना आवडली पाहिजे याचाही विचार करायला पाहिजे. असा टोमणा नेटकऱ्यानं अक्षयला मारला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका बॉलीवूडच्या चित्रपटांनाही बसला आहे. त्यात आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा. रणबीरचा समशेरा, विजय देवरकोंडाचा लायगर यांच्या नावाचा समावेश आहे. त्यावर बॉलीवूडच्या कित्येक सेलिब्रेटींनी ही एक तात्कालिक फेज असून त्याचा फारसा परिणाम होणार नाही. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: ग्लोबल बाप्पा : न्यूयॉर्क ते दुबई; गौरी पूजनाचे मुहूर्त

अक्षयचा कटपुतली काही अंशी का होईना नेटकऱ्यांना भावला आहे. मात्र त्यानं केलेल्या कॉपी प्रकरणाचा राग नेटकऱ्यांना आला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरवेळी तुझ्या चित्रपटांमुळेवाद होत असतो. तू वादापेक्षा तो चित्रपट आणखी कसा चांगला होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: स्टार्टअप् मुळे सात लाखांहून अधिक जणांना मिळाला रोजगार

Web Title: Cuttputlli Akshay Kumar Movie Actor Trolled Copied Bhuvan Bam Video Copy Issued

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..