बनावट लिंकनं नगमाचा केला घात.. भामट्यानं कॉल करुन लंपास केले लाखो.. जाणून घ्या कसं घडलं सगळं..Cyber Fraud with actress nagma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress And Politician Nagma

Cyber Fraud: बनावट लिंकनं नगमाचा केला घात.. भामट्यानं कॉल करुन लंपास केले लाखो.. जाणून घ्या कसं घडलं सगळं..

Cyber Fraud: बॉलीवूड अभिनेत्री आणि राजकारणात सक्रिय असलेली नगमा हिच्यासोबत नुकताच साइबर फ्रॉड झाला आहे. तिच्या फोनवर एक मेसेज आला होता,त्यातील लिंकवर क्लीक केल्यानंतर तिला लाखोंचा चूना लागला आहे.

नगमानं यासंदर्भात सांगितलं की जो मेसेज तिच्या फोनवर आला होता तो कुठल्याही प्रायव्हेट नंबरसारखा नव्हता, उलट ज्या नंबरवरनं बॅंकेचा मेसेज येतो अगदी तसाच होता.

गेल्या काही दिवसांत जवळपास ८० लोकांना अशाप्रकारे साइबर फ्रॉड करत फसवण्यात आलं आहे. यामध्ये आता नगमाचं नाव देखील सामिल आहे.

यामध्ये ज्यांना फसवण्यात आलं आहे ते जवळपास एकाच खाजगी बॅंकेतील खातेधारक आहेत. आहेत. रिपोर्टनुसार कळत आहे की, २८ फेब्रुवारीला झालेल्या या फ्रॉडमध्ये अभिनेत्री नगमाला जवळपास ९९,९९८ रुपयांचा गंडा लावण्यात आला आहे.(Cyber Fraud: Actress Nagma Become victim of kyc fraud after clicking on spam)

आपल्यासोबत हा फ्रॉड कसा झाला याविषयी नगमानं स्वतः एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर सांगितलं आहे.

ती म्हणाली की, ''मला मेसेज आला होता,ज्यावर मी क्लिक केलं. त्यानंतर लगेचच एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यानं स्वतःची बॅंकेचा कर्मचारी म्हणून ओळख सांगितली''.

त्यानं नगमाला मी केवायसीसाठी तुम्हाला मदत करेन असं म्हटलं.

नगमा पुढे म्हणाली की,''फ्रॉड करणाऱ्यानं तिच्या फोनचा रिमोट अॅक्सेस घेतला होता''.

हेही वाचा: डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...

नगमानं स्पष्ट केलं की लिंक वर तिनं कोणत्याच बॅंक डिटेल्स शेअर केल्या नव्हत्या.

'' माझ्यासोबत फ्रॉड करणाऱ्या त्या माणसानं माझ्या इंटरनेट बॅंकिगमध्ये लॉग इन केल्यावर बेनिफिशियरी अकाउंट बनवलं आणि एक लाख रुपये नॅशनलाइज बॅंकेत ट्रान्स्फर केले. मला तेव्हा अनेक ओटीपी नंबर आले,ज्यामध्ये कळलं की त्यानं हे पैसे लंपास करण्यासाठी किमान २० वेळा तरी प्रयत्न केले. माझं नशीब की मी खूप मोठी रक्कम गमावली नाही''.