दबंग खान होतोय म्हातारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि दिग्दर्शक कबीर खान यांनी एकत्र केलेले चित्रपट सुपरहिट होतात; पण या दोघांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट "ट्युबलाइट' बॉक्‍स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

याचा सलमान व कबीर यांच्या मैत्रीवर अजिबात परिणाम झाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सलमान कबीर खानच्या पुढील चित्रपटात काम करणार आहे आणि त्यात सलमान वरिष्ठ नागरिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. म्हणे, सलमानला आता कॅरेक्‍टर रोल करायचे आहेत.

त्याला साचेबद्ध भूमिका करायच्या नाहीत. सलमान खानच्या "ट्युबलाइट' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी कबीर खानने या प्रोजेक्‍टसाठी सलमानकडून होकार मिळवला होता आणि आता लवकरच ते दोघे या चित्रपटावर काम करणार आहेत; मात्र अद्याप या चित्रपटाची अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही.  

Web Title: Dabang salman khan Old age man