अरूण गवळी यांना 'डॅडी'च्या प्रिमिअरसाठी पॅरोल नाकारला

टीम ई सकाळ
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

येत्या 8 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या डॅडी या चित्रपटाच्या प्रिमिअरला उपस्थित राहता यावे यासाठी कुख्यात गुंड, आमदार अरूण गवळी यांना पॅरोल नाकारण्यात आला आहे. हा चित्रपट 21 जुलैला येणार होता, पण गवऴी यांना उपस्थित राहता यावे यासाठी याचे प्रदर्शन पुढे ढकलून 8 सप्टेंबर करण्यात आले. 

मुंबई :  येत्या 8 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या डॅडी या चित्रपटाच्या प्रिमिअरला उपस्थित राहता यावे यासाठी कुख्यात गुंड, आमदार अरूण गवळी यांना पॅरोल नाकारण्यात आला आहे. हा चित्रपट 21 जुलैला येणार होता, पण गवऴी यांना उपस्थित राहता यावे यासाठी याचे प्रदर्शन पुढे ढकलून 8 सप्टेंबर करण्यात आले. 

सध्या गवळी नागपूर कारगृहात आहेत. अर्जुन रामपाल यांची मुख्य भूमिका असलेला डॅडी हा चित्रपट अरुण गवळी यांच्यावरच बेतलेला आहे. या चित्रपटाला त्यांनी उपस्थित राहावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. शेवटी हा पॅरोल तुरुंग प्रशासनाने नाकारला आहे. यावर गवळी यांच्याकडून मात्र काही प्रतिक्रीया अद्याप आलेली नाही.  

Web Title: Daddy movie premier No permission to Arun Gawali esakal news