'बजरंगी'चा विक्रम मोडत 'दंगल'ने कमावले 480 कोटी

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई : गीता आणि बबिता या फोगाट भगिनींच्या जीवनावर आधारित 'दंगल' चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत असून तो नवे विक्रम रचत आहे. केवळ दोन आठवड्यांत बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ला मागे टाकत 'दंगल'ने 320.16 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'दंगल'च्या भारतातील आणि परदेशातील अशा एकूण कमाईने आतापर्यंत 480 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान याचा 'दंगल' कमाईचे सर्व विक्रम मागे टाकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 'सुलतान'चा देशांतर्गत कमाईचा 301 कोटींचा विक्रम 'दंगल'ने मोडला असून, आता 'बजरंगी भाईजान'चाही विक्रम त्याने मोडला आहे. 'आमीर' अभिनयाने समृद्ध अशा या चित्रपटाने शनिवारपर्यंत सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ला मागे टाकले आहे. 
 
चित्रपट व्यवसायाचे विश्लेषक तरण आदर्श यांनी यासंदर्भातील बॉक्स ऑफिसचे आकडे ट्विटरवरून शेअर केले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 'दंगल'ने 29.78 कोटी, दुसऱ्या दिवशी 34.82 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.41 कोटी, चौथ्या दिवशी 25.69 कोटी, पाचव्या दिवशी 23.09 कोटी, सहाव्या दिवशी 21.46 कोटी, सातव्या दिवशी 20.29 कोटी, आठव्या दिवशी 18.59 कोटी, नवव्या दिवशी 23.07 कोटी, आणि दहाव्या दिवशी 32.04 कोटी, अकराव्या दिवशी 13.45 कोटी रुपयांची कमाई केली. 
 
Web Title: dangal makes record at box office

फोटो गॅलरी