Movie Review; हद्याला भिडणारा, मनाचा ठाव घेणारा 'दरबान'

युगंधर ताजणे
Monday, 7 December 2020

झी 5 वर प्रदर्शित झालेला दरबान चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. ज्यावेळी भारतीय साहित्य ऐन भरात होते त्यावेळी या नव्या माध्यमाचा फारसा प्रभाव जाणवला नाही.

मुंबई - नोबेल पुरस्कारप्राप्त साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित असलेला दरबान हा चित्रपट वेळ काढून जरुर पाहावा अशा कॅटगरीतला आहे. मानवी भाव भावना, संवेदना यांने दिलेलं स्थान त्यातून उलगडत जाणारी अनोख्या मानवी नात्याची गोष्ट मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. कथा खूप वर्षांपूर्वीची असली तरी त्याचे चित्रपट माध्यमात केलेलं रुपांतर खास पाहण्यासारखे असे म्हणावे लागेल.

मालक आणि एक नोकर यांच्यातील नात्याचा वेध घेणारा हा चित्रपट आहे. ज्या पध्दतीनं कथा वेगवेगळ्या पात्रांमध्ये गुंफण्यात आली आहे ते पाहून प्रेक्षक म्हणून आपण हेलावून जातो. काही झालं तरी आपल्या सेवेप्रती असलेला समर्पित भाव हा काही सोडायचा नाही. त्याची जाण ठेवायची असं त्या नोकराला नेहमी वाटत असते. त्यातून मालक आणि नोकरातील हे मानसिक आंदोलन सतत सुरु राहते. आणि आपल्या मनाचा ठाव घेते. गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयाच्या दर्जेदार मालिका आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

 

झी 5 वर प्रदर्शित झालेला दरबान चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. ज्यावेळी भारतीय साहित्य ऐन भरात होते त्यावेळी या नव्या माध्यमाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. किंबहूना तो तितका नव्हताही. आणि आताच्या युगात त्याचा प्रभाव कमालीचा असून त्यातुलनेनं साहित्याकडे दुय्यमतेच्या भावनेनं पाहिल जात आहे. अशात हा चित्रपट आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो.  ज्यात कॅमेराच्या साह्याने मानवी मनाचा संवदेनशीलपणे वेध घेतला आहे. रविंद्रनाथ टागोर यांच्या 'खोकाबाबूर प्रत्यबर्तन या कथेवरुन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 1960 मध्ये या कथेवर बंगालमध्ये चित्रपट तयार झाला होता.

आताच्या चित्रपटात शारिब हाश्मी, शरद केळकर यांनी भूमिका केली आहे. मात्र ज्यानं दरबानचं काम केलं आहे अशा हाशिमला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. त्याला कमेंट येत आहे. 1970  सालापासून ही कथा सुरु होते. त्यात नरेन त्रिपाठी हे एका कोळशाच्या खाणीचे मालक आहेत. त्यांना भाऊ आहे. मोठ कुटूंब आहे. रायचरण या घरातल्या प्रत्येकाचा आहे. सगळ्यांवर त्याचे प्रेम आहे. त्याचा स्वभावच असा आहे की त्यानं घरातल्या प्रत्येकाला आपलेसं केलं आहे. 

'आदिपुरुष', 'राधे श्याम'नंतर प्रभासने केली आणखी एका सिनेमाची घोषणा

सरकारनं कोळशाच्या खाणीचं जेव्हा राष्ट्रीयकरण करण्यात आले त्यावेळी नरेन बाबूंची डोकेदुखी वाढली आहे. त्य़ामुळे त्यांना आपला पूर्वजांच्या पुण्याईनं मिळालेला वाडा सोडावा लागला आहे. अशातच रायचरण आणि अनुकूलची ताटातुट होते. इथून कथेला वेगळे वळण मिळते.रायचरणच्या मनात काय आहे, त्याची बायको त्याला नेहमी काय सांगत असते, तो कुठला निर्णय घेतो यासगळ्या प्रश्नांसाठी दरबान पाहावा लागेल.

वादग्रस्त असल्याचा शिक्का बसलेली "अ सुटेबल बॉय''; का पाहावी ?

निर्माता आणि दिग्दर्शक बिपिन नाडकर्णी यांनी ज्या पध्दतीनं रायचरण आणि अनुकूल मधील भावनिक बंध साकारला आहे त्यासाठी हा चित्रपट जरुर पाहावा. दिग्दर्शकानं 19 व्या शतकातली कथा आता 20 व्या शतकात सादर केली आहे. त्यासाठी त्यानं घेतलेली मेहनत दिसून येते. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी छान आहे. त्यामुळे चित्रपटाची उंची वाढली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darbaan new movie relesed story based on Poet Rabindranath Tagore