'आदिपुरुष', 'राधे श्याम'नंतर प्रभासने केली आणखी एका सिनेमाची घोषणा

prabhas salaar
prabhas salaar

मुंबई- साऊथ सुपरस्टार आणि बाहुबली फेम प्रभास सध्या त्याच्या आगामी सिनेमांमुळे खूपच चर्चेत आहे. प्रभासचे चाहते त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'आदिपुरुष', 'राधे श्‍याम' आणि दीपिका पादुकोणसोबतच्या सायन्स फिक्‍शन सिनेमानंतर आता प्रभासने आणखी एक सिनेमा साईन केला आहे. नुकतीच या सिनेमाची त्याने घोषणा देखील केली आहे. 

प्रभासने दिग्दर्शक प्रशांत नील यांचा पुढील सिनेमा साइन केला आहे. नुकतीच त्याने त्याच्य आगामी सिनेमाची घोषण केली आहे. या सिनेमाचं नाव आहे 'सलार'. हा एक ऍक्‍शनपट असणार आहे. प्रशांत नीलने नुकतीच हैदराबादमध्ये या प्रोजेक्टसाठी प्रभासची भेट घेतली. त्यानंतर प्रभासने सिनेमाची कथा ऐकल्यानंतर या प्रोजेक्टला होकार दिला. या सिनेमातील पहिला लूक देखील प्रभासने त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर शेअर केला आहे जो खूपच इंटेंस आहे. या पोस्टरमध्ये प्रभास हा गन घेऊन बसलेला दिसतोय. 

या सिनेमाचं शूटिंग पुढच्या वर्षी जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यात प्रभाससोबत कोणती अभिनेत्री झळकणार आहे हे अजुनही कळू शकलेलं नाही. सध्या प्रशांत त्याच्या आगामी 'केजीएफ:चॅप्टर 2′ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सध्या प्रभास एका सिनेमासाठी चर्चेत आहे तो म्हणजे दिग्दर्शक ओम राऊत यांचा 'आदिपुरुष', जो एक पीरियड ड्रामा आहे. या सिनेमात प्रभास हा रामची भूमिका साकारत असून सैफ अली खान लंकेशची आणि अभिनेत्री क्रिती सॅनन सीतेची भूमिका साकारणार आहे.

prabhas looks intimidating in prashanth neels upcoming salaar  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com