बॉलीवूडचा प्रसिद्ध पॉप गायक 'TAZ' चं निधन; हृतिक,जॉनसाठी गायलेली हीट गाणी singer Taz dies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daru Vich Pyar singer Taz dies

बॉलीवूडचा प्रसिद्ध पॉप गायक 'TAZ' चं निधन; हृतिक,जॉनसाठी गायलेली हीट गाणी

बॉलीवूडचा(Bollywood) प्रसिद्ध गायक Taz विषयी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. २९ एप्रिल रोजी गायक TAZ चं निधन झालेलं आहे. ही बातमी कळल्यानंतर बॉलीवूडशी संबंधित म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. Taz च्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर चाहते Taz ला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. Tazनं १९९० ते २००० या सालात आपल्या गाण्यांवर लोकांना ताल धरायला लावलं होतं. Tazचं खरं नाव होतं तरसमे सिंग सैनी. पॉप म्युझिक सिंगर Taz चं नचांगे सारी रात हे गाणं खूप हिट झालं होतं.

हेही वाचा: Viral Video: उर्फी जावेदला अश्लील सिनेमा शूट करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Taz चं वय केवळ ५४ वर्ष होतं. सूत्रांच्या माहितीनुसार Tazची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठिक नव्हती. तो कोमा मध्ये देखील होता. नुकताच काही दिवसांपूर्वी तो कोमामधून बाहेर आला होता. आता अचानक बातमी कानावर पडली की २९ एप्रिल रोजी Taz चं निधन झालं आहे. त्याला हर्निया आजार झाल्याचं बोललं जात आहे. दोन वर्षापूर्वी त्याची या आजारासंदर्भात एक सर्जरीही होणार होती. पण कोव्हिड-१९ मुळे त्याला ती सर्जरी वेळेत करता आली नाही. Tazनं आपल्या गाण्यांमुळे भारतातही पॉप कल्चरला प्रसिद्धि मिळवून दिली होती. 'नचांगे सारी रात' या गाण्या व्यतिरिक्त 'गल्लां गोरियां' आणि 'दारू विच प्यार' ही त्याच्या करिअरमधील काही हीट गाणी आहेत,ज्यामुळे त्याला प्रसिद्धि मिळाली.

Taz नं हृतिक रोशनसाठी २००३ मध्ये एका सिनेमासाठी गाणं गायलं होतं. 'इट्स मॅजिक' या हृतिकच्या Taz नं गायलेल्या गाण्यानं लोकांना खूप नाचवलं होतं. त्यावेळी होणाऱ्या पार्टीत हे गाणं वाजवलंचं जायचं. आजही अनेक पार्टी,कार्यक्रमांमध्ये Taz ची गाणी लोकांना थिरकायला मजबूर करतात.

हेही वाचा: LockUpp: पूनम पांडे पुन्हा होणार 'टॉपलेस'; म्हणाली,'यावेळेस तर...'

सोशल मीडियावर Taz च्या निधनाची बातमी वेगानं व्हायरल होताना दिसत आहे. बॉलीवूडपासून सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत अनेकांनी आपल्या लाडक्या गायकाला श्रद्धांजली वाहिली आहे. सिने-निर्माता गुरिंदर चड्ढानं Taz चा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, Taz च्या निधनाच्या बातमीनं मनाला खूप वेदना होत आहेत. ब्रिटिश एशियन म्युझिकचं भरपूर ज्ञान असलेला Taz आता आपल्यात राहिला नाही यावर विश्वासच बसत नाही.

Web Title: Daru Vich Pyar Singer Taz Dies Jay Sean Gurinder Chadha Mourn His

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top