Viral Video: उर्फी जावेदला अश्लील सिनेमा शूट करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

आपल्या अतरंगी फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असणारी सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
Urfi Javed News Updates
Urfi Javed News UpdatesGoogle

आपल्या अतरंगी फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असणारी सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेदचा(Urfi Javed) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया(Social Media)वर जोरदार चर्चेत आहे. पण हा व्हिडीओ पाहून उर्फीच्या चाहत्यांना मात्र जोरदार झटका लागला आहे. या व्हिडीओ चक्क पोलिस या ग्लॅम डॉलला ब्लू फिल्म शूट करताना रंगेहाथ पकडताना दिसत आहेत. आता हे वाचून नक्कीच थोडा धक्का बसला असेल. कारण उर्फी भले विचित्र फॅशनेबल कपडे घालून इकडे-तिकडे फिरताना दिसत असेल पण अद्याप तिच्याविषयी वाईट काही कानावर पडलं नव्हतं. तेव्हा आधी त्या व्हिडीओमागचं सत्य जाणून घेऊया. (Urfi Javed News Updates)

Urfi Javed News Updates
करिश्मा कपूरनं दुसऱ्या लग्नाविषयी तोडली चुप्पी; चाहत्यांना सांगितली अडचण

या व्हिडीओला फेब्रुवारी महिन्यात कंटेट क्रिएटर रोहित गुप्तानं शेअर केला होता. व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की,उर्फी एका ऑफिसमध्ये दिग्दर्शकाला भेटायला जाते. त्या दिग्दर्शकाला तिला आपल्या सिनेमात कास्ट करायचं असतं. तो उर्फीला सांगतो की, या प्रोजेक्टविषयी सगळं काही सीक्रेट आहे. सिनेमात रणबीर कपूर खलनायकाची भूमिका साकारत आहे. हे ऐकून उर्फीचा उत्साह एकदम वाढलेला दिसत आहे. तिला सांगितलं जातं की,सिनेमात हिरोसाठी हॉलीवूडच्या अभिनेत्याला कास्ट केलं जाणार आहे आणि बादशाह या सिनेमाची गाणी करणार आहे. सिनेमाचं नाव असेल टायटॅनिक...

यानंतर रोहित गुप्ता दुसरा एक दिग्दर्शक बनून ऑफिसमध्ये येतो आणि सिनेमाच्या लीड अभिनेत्याला सोबत घेऊनच येतो. जेव्हा उर्फी लीड अभिनेत्याविषयी विचारते तेव्हा तिला सांगितलं जातं की तो युगांडाचा आहे. यानंतर दिग्दर्शक ऑडिशनसाठी उर्फीला बोलावतो आणि तिला विचित्र असे संवाद बोलायला सांगितले जातात. तेव्हा एक माणूस पोलिसांचा खाकी युनिफॉर्म घालून येतो आणि ऑफिसमध्येच थेट घुसतो. आणि सर्वांना अश्लील सिनेमा शूट करण्याच्या आरोपात अटक करतो. बस त्यानंतर घडलं ते धमालच.

Urfi Javed News Updates
LockUpp: पूनम पांडे पुन्हा होणार 'टॉपलेस'; म्हणाली,'यावेळेस तर...'

ते ऑफिसनधले तिघे बोगस दिग्दर्शक आणि अॅक्टर उर्फीवर उलटा आरोप करतात. हे ऐकून उर्फी भयंकर चिडते आणि आपल्या मॅनेजरला फोन करते आणि त्याच्यावर डाफरते. ती म्हणते,'कुठल्या ऑडिशनला पाठवलं आहेस मला'. ती खूप टेन्शनमध्येही दिसतेय. तेव्हाच तिचा मॅनेजर खुलासा करतो की, तो एक प्रॅंक होता. उर्फीला देखील विश्वास बसत नाही की तिच्यासोबत इतका मोठा प्रॅंक झाला. आणि नंतर ती स्वतःच या सगळ्यावर हसताना दिसत आहे. उर्फीचा प्रॅंक व्हिडीओ बातमीत जोडला आहे,नक्की पहा आणि मजा आली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com