esakal | 'या' कारणामुळे ‘फनी बॉय’ सिनेमा ऑस्कर अकादमीने नाकारला
sakal

बोलून बातमी शोधा

funny boy oscar

‘फनी बॉय’ या सिनेमातील कथा १९७०-८० या काळात श्रीलंकेत घडल्याचं दाखवलं असून त्यात तरुण बंडखोर नायक अरजी हा वांशिक संघर्ष काळात श्रीलंकेत राहणारा एक समलिंगी तरुण आहे.

'या' कारणामुळे ‘फनी बॉय’ सिनेमा ऑस्कर अकादमीने नाकारला

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- भारतीय कन्नड सिने निर्माती दीपा मेहता यांच्या 'फनी बॉय'ला ९३ व्या अकादमी पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म कॅटगरीमधून ऑस्कर नामांकनासाठी फेटाळून लावलं आहे.  यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत कॅनडाच्या वतीने पाठवण्यात आलेला ‘फनी बॉय’ हा प्रसिद्ध निर्मात्या दीपा मेहता यांचा चित्रपट अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्स या संस्थेने नाकारला आहे. आंतरराष्ट्रीय सिनेमा कॅटगरीमध्ये या सिनेमाची प्रवेशिका होती पण या सिनेमात पन्नास टक्क्य़ांहून अधिक संवाद हे इंग्रजी भाषेत असल्याने तो स्पर्धेसाठी ग्राह्य धरता येत नाही असं सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून होणार या अभिनेत्रीची एक्झिट?    

‘फनी बॉय’ या सिनेमातील कथा १९७०-८० या काळात श्रीलंकेत घडल्याचं दाखवलं असून त्यात तरुण बंडखोर नायक अरजी हा वांशिक संघर्ष काळात श्रीलंकेत राहणारा एक समलिंगी तरुण आहे.  त्याच्या या वेगळेपणाला त्याच्या कुटुंबात विरोध असतो. श्रीलंकेत तामिळी व सिंहली यांच्यातील संघर्ष तीव्र असतानाच्या काळातील हे कथानक आहे. हा सिनेमा श्याम सेल्वादुराई यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स एँड सायंसनुसारम मेहता यांच्या एक तास ४९ मिनिटांच्या लांबलचक सिनेमात १२ मिनिट आणि २७ सेकंदंच तमिळ किंवा सिंहली संवाद आहेत. यावर दिपा मेहता यांनी म्हटलंय की, मला आशा आहे फनी बॉय त्याच्या प्रेम, साहस आणि करुणाच्या कथेसोबतंच ट्रांसजेंडरच्या आशा वाढवेल. सिनेमाला नामांकित करणा-या टेलिफिल्म कनाडाचं म्हणणं आहे की फनी बॉयला आता बेस्ट पिक्चरआणि सामान्य प्रवेश श्रेणीमध्ये सादर केला जाईल. तर ९३ व्या अकादमी पुरस्कारामध्ये भारताकडून मल्याळम सिनेमा जल्लीकट्टूला नामांकित केलं गेलं आहे. 

deepa mehta funny boy rejects from oscars international feature category