दीपिका करणार वाढदिवशी 14 तास काम!

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

दीपिका तिच्या "ट्रिपल एक्‍स...' चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबरच वाढदिवस साजरा करणार आहे. तेही चित्रपटाचे प्रमोशन करता करता...

मुंबई - बॉलीवूडच्या 'मस्तानी'ने अर्थात दीपिका पादुकोणने आपल्या अदांनी अख्ख्या जगाला वेड लावले आहे. आज (गुरुवार) तिचा वाढदिवस आहे; मात्र मेक्‍सिकोत असलेली दीपिका नेहमीप्रमाणे आपल्या वाढदिवशी बॉलीवूडमधील मित्र-मैत्रिणींसाठी पार्टी न देता चक्क 14 तास काम करून हटके सेलिब्रेशन करणार आहे.

दीपिकाचा पहिला हॉलीवूडपट "ट्रिपल एक्‍स-द रिटर्न ऑफ झांडर केज' 14 जानेवारीला भारतात प्रदर्शित होत आहे. ती त्यात एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच ती सध्या व्यस्त आहे. त्यामुळे तिचा वाढदिवस काम करण्यातच जाणार आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेक्‍सिकोमध्ये गेली आहे. प्रमोशनमध्ये सहभागी झाल्यानंतर ती मीडियाशीही बातचीत करणार आहे. अर्थात दीपिका तिच्या "ट्रिपल एक्‍स...' चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबरच वाढदिवस साजरा करणार आहे. तेही चित्रपटाचे प्रमोशन करता करता...

Web Title: Deepika Padukone 30th Birthday