कान महोत्सवात दीपिका

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

पुढील महिन्यात होणाऱ्या 70 व्या कान चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सोनम कपूर आणि ऐश्‍वर्या राय-बच्चन या सहभागी होणार आहेत.

ऐश्‍वर्या आणि सोनम यांनी अनुक्रमे 2002 व 2011 मध्ये कानमधील "रेड कार्पेट'चा अनुभव घेतला आहे. यंदा दीपिका प्रथमच यात सहभागी होणार आहे.

सौंदर्यप्रसाधनातील "लॉरियल पॅरिस' या जगप्रसिद्ध ब्रॅंडसाठी मेकअप व विविध स्टाईलमुळे होणारा कायापालट त्या दाखविणार आहेत. त्यांच्याबरोबर हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिऍन मूर, इव्हा लोंगोरिया याही सहभागी होणार आहेत. 17 ते 28 मे या कालावधीत कान महोत्सव होणार आहे.

Web Title: Deepika Padukone To Make Her Second Red Carpet Appearance At The Cannes Film Festival