राणी पद्मिनी यांचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत

गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

अखेर संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाचे एक झगमगीत पान उलगडले. आज घटस्थापनेच्या दिवशी या चित्रपटात राणी पद्मिनीची भूमिका साकारणाऱ्या दिपिका पदुकोनचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर लाॅंच करण्यात आला. दीपिका पदुकोन, रणवीर सिंग आदींनी ट्विटरवर राणी पद्मिनीचा फोटो शेअर केला आहे.

मुंबई : अखेर संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाचे एक झगमगीत पान उलगडले. आज घटस्थापनेच्या दिवशी या चित्रपटात राणी पद्मिनीची भूमिका साकारणाऱ्या दिपिका पदुकोनचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर लाॅंच करण्यात आला. दीपिका पदुकोन, रणवीर सिंग आदींनी ट्विटरवर राणी पद्मिनीचा फोटो शेअर केला आहे.

दीपिकाने सकाळी 6 वाजता आपला राणी पद्मिनीचा फोटो शेअर केला. त्याचासोबत रणवीर सिंगनेही तिचा फोटो शेअर करत रानी पद्मिनी पधार रही है असं लिहिलं. त्यानंतर मात्र सर्वत्र पद्मावतीचा फिव्हर पाहायला मिळाला. सुरेख दागिन्यांमध्ये नटलेल्या दीपिकाच्या प्रतिमेने लाेकांवर भूरळ पडली नसती तरच नवल.  आता दीपिकाची इतकी नेत्रदीपक छबी पाहिल्यानंतर या चित्रपटात असलेले रणवीर सिंग, शाहीद कपूर यांच्या भूमिकांची छबी पाहण्यासाठीही आपण उत्सुक असल्याचे या कलाकारांच्या पोस्टला आलेल्या कमेंटस वरून वाटतं. 

 

Web Title: deepika padukone as padmavati first look esakal news