esakal | दीपिका पदुकोन म्हणते सुशांतच्या परफार्मन्समध्ये दम होता...
sakal

बोलून बातमी शोधा

sushant and deepika

आता अभिेनेत्री दीपिका पदुकोनचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि त्यात दीपिकाने सुशांतच्या परफॉर्मन्समध्ये दम होता, असे म्हटले आहे.

दीपिका पदुकोन म्हणते सुशांतच्या परफार्मन्समध्ये दम होता...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतने गेल्या रविवारी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि सारा देश हळहळला. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. पोलिसांनी सुशांतची मैत्रीण आणि काही मंडळींची विचारपूस सुरू केली. सुशांतची आत्महत्या का झाली आणि कशामुळे झाली याचा शोध पोलिस घेतीलच.

शैक्षणिक धोरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप नकोच; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश.. 

आता अभिेनेत्री दीपिका पदुकोनचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि त्यात दीपिकाने सुशांतच्या परफॉर्मन्समध्ये दम होता, असे म्हटले आहे. खरंतर सुशांत एक टॅलेंटेड अभिनेता होता. हिंदीमध्ये कुणीही गॉडफादर नसताना त्याने आपली एक वेगळी ओळख हिंदी चित्रपटसृष्टीत बनविली होती. यशाची एकेक पायरी तो वर चढत होता. 

'या' तारखांची नोंद करून ठेवा, या तारखांना यावेळी येणार समुद्रात हायटाईड

मात्र, त्याच्या निधनाची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. दीपिकाने सन 2017 मध्ये सुशांतच्या आलेल्या राब्ता या चित्रपटात स्पेशल डान्स नंबर केला होता. सुशांतच्या फॅन्स क्लबने दीपिकाच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि तो खूप व्हायरल होत आहे. 

रुग्णांना होम क्वारंटाईन करणं ठरतंय फायदेशीर; गंभीर रुग्णांसाठी बेड्स झाले रिकामे.. 

त्या मुलाखतीत दीपिकाला एक प्रश्न विचारण्यात आला की परफॉर्मन्सच्या हिशोबानुसार तू कोणत्या अभिनेत्याला अधिक रेटिंग देशील...तेव्हा तिने उत्तर दिले, की सुशांत संह राजपूतचा परफॉर्मन्स मला खूप आवडतो. केवळ दीपिकाच नाही तर सगळ्यांनाच सुशांतची अॅक्टिंग खूप आवडत होती. तो कमालीचा अभिनेता होता.
 

loading image
go to top