डीपी के सुझाव: दीपिकाने चाहत्यांसाठी शेअर केले स्वतःचे क्रिएटिव्ह सिक्रेट्स....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

लॉकडाउनमुळे प्रत्येक कलाकार घरातच बंद झाला आहे. कामातल्या व्यस्ततेतून प्रत्येकाला स्वतः कडे बघण्यासाठी, विचार करण्यासाठी देखील वेळ मिळाला आहे आणि हा वेळ प्रत्येकजण आपापल्या तऱ्हेने सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबई : प्रत्येक कलाकारासाठी स्वतःची क्रिएटिव्हिटी अतिशय महत्त्वाची असते, आणि त्यासाठी प्रत्येक कलाकार झटत असतो, स्वतः वर प्रचंड मेहनत घेते असतो. लॉकडाउनमुळे प्रत्येक कलाकार घरातच बंद झाला आहे. कामातल्या व्यस्ततेतून प्रत्येकाला स्वतः कडे बघण्यासाठी, विचार करण्यासाठी देखील वेळ मिळाला आहे आणि हा वेळ प्रत्येकजण आपापल्या तऱ्हेने सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करत आहे.

दीपिका पादुकोण देखील याला अपवाद कसा असेल, लॉकडाउनच्या आधीपासूनच, दीपिकाकडे मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भली मोठी यादी होती, जे तिला स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी पाहायचेच होते. मात्र आपल्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमात ते मागे पडत होते.

हेही वाचा: बापरे! महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर दिवसाला येतात तब्बल 'इतके' फोन; लाईनची क्षमता वाढवली..

या लॉकडाऊनमुळे तिला ही आयतीच संधी चालून आलेली असून लॉकडाऊनमधला आपल्या दिवसातला बराचसा वेळ  या कामासाठी राखून ठेवला आहे. या वेळात ती न चुकता नावाजलेले इंग्रजी तसेच गाजलेले हाॅलीवूडचे चित्रपट तसेच काही वेबसीरीज  बघून आपला वेळ घालवते आहे.

एवढेच करून दीपिका थांबलेली नाही तर, तिने सोशल मीडियावर देखील आपण बघत असलेल्या उत्तमोत्तम कलाकृतींची यादी आपल्या चाहत्यांना शेअर केली आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक हाइलाइट आहे ज्यात तिने सुचवलेल्या कलाकृतींची यादी आहे.  

ती चाहत्यांमध्ये 'डीपी के सुझाव' म्हणून प्रसिद्ध आहे. यात जोजो रैबिट, फैंटम थ्रेड, हर, इनसाइड आउट, स्लीपलेस नाइट्स इन सिएटल यासारख्या चित्रपटांचा आणि पाताल लोक, हॉलीवुड यांसारख्या वेबसिरीजचा समावेश आहे.

हेही वाचा: मुंबईकरांनो लोकल सुरू झाल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; ही अधिकृत माहिती वाचा

दीपिका पादुकोणने आपल्या लॉकडाऊनमधील दिवसाचा वेळ खास यासाठी राखून ठेवला आहे. दीपिकाची ही सगळी मेहनत तिला सेटवर परतण्याच्या काळात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. जर हे लॉकडाउन नसते तर, दीपिका या वेळी श्रीलंकेमध्ये शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असती.

deepika padukon shared her creative secretes with fans 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukone shared her creative secretes with fans