दीपिका-रणवीरची केमिस्ट्री ऑनस्क्रीनही! कपिल देव-रोमीचा लूक व्हायरल

वृत्तसंस्था
Thursday, 20 February 2020

सध्या सगदळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे रणवीर साकारत असलेल्या '83' चित्रपटाची. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटामधील सर्व खेळाडूंचे लूक एक एक करून रणबीरने प्रसिद्ध केले होते. मात्र काल कपिल यांच्या पत्नी अर्थात रोमी यांचे पोस्टर रिलीज झाले आहे. कोण साकारणार रोमी यांची भूमिका?

कमल हासनच्या शूटींगदरम्यान अपघात; तिघांचा मृत्यू

"पद्मावत', "बाजीराव मस्तानी'सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन पुन्हा एकदा ऑन स्क्रिन केमिस्ट्रीसाठी तयार आहेत. दोघंही "83'मध्ये झळकतील. या चित्रपटात रणवीर कपिल देव; तर दीपिका त्यांची पत्नी रोमीच्या भूमिकेत दिसणार आहे. रोमीच्या भूमिकेतील दीपिकाचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. यामध्ये रणवीर कपिलच्या वेशात; तसेच दीपिका रोमीच्या गेटअपमध्ये अगदी उठून दिसत आहेत. दीपिकाने हे लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रणवीरसोबतचा लूक शेअर करताना दीपिका म्हणते, 'क्रिकेट जगतातल्या ऐतिहासिक क्षणांच्या चित्रपटात मला भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी अभिममानाची गोष्ट आहे. सगळ्याच पत्नी या तिच्या पतीचे स्वप्न समोर ठेवून जगत असतात. कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांची भूमिका मी साकारत आहे.' कपिल देव यांच्या क्रिकेटमध्ये त्यांची पत्नी रोमी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्या खंबीरपणे कपिल यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या होत्या.  

कबीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १९९३ साली भारताने क्रिकेट विश्वकरंडक जिंकला होता. त्यावेळी कपिल देव कॅप्टन होते. याच ऐतिहासिक क्षणांना "83'मधून पुन्हा उजाळा मिळणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukone will play roll of Kapil Devs wife Romi role in movie 83