दीपिका - रणवीरच्या ब्रेकअपची 'चर्चा'

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

बॉलिवूडमधील आघाडीची जोडी दीपिका पदुकोन आणि रणवीर कपूर यांचे ब्रेकअप होऊ शकते अशी चर्चा आहे. दोघांच्याही वेगवेगळ्या कामांच्या शेड्युलमधील व्यग्रतेमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बॉलिवूडमधील सूत्रांनी सांगितले. 

अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये सर्वांत यशस्वी ठरलेली दीपिका पदुकोन हिने नेहमीच रणवीरसोबतच्या नात्यावर बोलायचं टाळलं आहे. सध्या त्यांच्यात सर्व काही कुशल चालले नसल्याची चर्चा असून, त्यांचे ब्रेकअप होणार असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत विचारल्यावर दीपिकाने काही बोलण्यास नकार दिला. मात्र, पत्रकारांनी या कथित ब्रेकअप विषयाचा पाठपुरावा केल्यावर तिने मौन सोडले... 

दीपिका म्हणाली, "तो (रणवीर) नेहमीच माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक राहिला आणि पुढेही नेहमीच अत्यंत महत्त्वाचा घटक राहील."

एक नातं टिकण्यासाठी हेच तर हवं असतं. या हॉट फेव्हरीट जोडीचं नातंही तसंच राहावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा!

Web Title: Deepika - Ranbir's breakup 'talk'

टॅग्स