एनसीबीकडुन दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलचे मोबाइल फोन्स जप्त

युगंधर ताजणे
Sunday, 27 September 2020

सुशांत आत्महत्या प्रकरणात शनिवारी दीपिका, श्रद्धा, सारा यांची चौकशी करण्यात आली. रकुल प्रित सिंह ची यापुर्वी झाली आहे. एनसीबीकडुन आता यासर्वांचे मोबाइल फोन्स जप्त करण्यात आले आहे. यासगळ्या प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये  करणने ड्रग्ज घेतल्याचा आरोप दिग्दर्शक करण जोहरवर करण्यात आला आहे.

मुंबई - एनसीबीकडुन बाँलीवुडमधील दिग्गज कलाकारांची झाडाझडती होत असताना त्यातुन अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची आत्महत्या त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तपासयंञणांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सध्या बाँलीवुडच्या बड्या कलाकारांना तपासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यामागील गुढ नेमके काय आहे, याबद्दल अनेकांना कुतुहल आहे. 

सुशांत आत्महत्या प्रकरणात शनिवारी दीपिका, श्रद्धा, सारा यांची चौकशी करण्यात आली. रकुल प्रित सिंह ची यापुर्वी झाली आहे. एनसीबीकडुन आता यासर्वांचे मोबाइल फोन्स जप्त करण्यात आले आहे. यासगळ्या प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये  करणने ड्रग्ज घेतल्याचा आरोप दिग्दर्शक करण जोहरवर करण्यात आला आहे. यासंबधीची अधिक माहिती इंटरनेटवरुन प्रसारित झाल्याने खळबळ उडाली होती. या पार्टीमध्ये दिपिका पादुकोण, रणबीर कपुर, वरुण धवन, शाहिद कपुर, अर्जुन कपुर यांच्यासह बाँलीवुड मधील अनेक कलाकार उपस्थित होते. सुशांतच्या आत्महत्येचा तपास करताना बाँलीवुड मधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे.

हे वाचा - श्रध्दा कपुर आणि सारा अली खानच्या अडचणी वाढल्या की संपल्या ?

अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. या चार अभिनेत्रींसोबतच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, सिमोन खंबाटा आणि जया साहा यांचेसुद्धा फोन्स जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे. एनसीबीच्या विशेष पथकाने कुलाबा येथील विश्राम गृहावर अभिनेत्री दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्याकडे चौकशी केली. दोघींना समोरासमोर आणून अंमलीपदार्थांचे सेवन, पुरवठा आदीबाबत प्रश्न विचारण्यात आले.

निष्पक्ष तपासासाठी नव्या मेडिकल बोर्डाची करावी स्थापना

एनसीबीने शनिवारी अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान यांच्याकडे चौकशी केली. सुशांतसोबत काम करणाऱ्या या दोन अभिनेत्रींकडे चार ते पाच तास चौकशी केली. सुशांत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान साराचे नाव घेतले होते. तर या प्रकरणाच्या चौकशीतून श्रद्धा सुशांतच्या पुणे इथल्या फार्महाउसमध्ये आयोजित पार्टीत हजर होती, अशी माहिती एनसीबीच्या हाती लागली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी कलाकारांना बोलावण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB seized Mobile phones of Deepika, Shraddha, Sara and Rakul