दीपिकाने घेतला पती रणवीरचा क्लास; बोलली 'घर आजा, बताती हूं'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

बॉलिवूडचे 'परफेक्ट कपल' म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादूकोन आणि रणवीर सिंह हे दोघेही नेहमी एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येतात.

मुंबई : बॉलिवूडचे 'परफेक्ट कपल' म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादूकोन आणि रणवीर सिंह हे दोघेही नेहमी एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येतात. एखादे प्रिमीयर असो किंवा सोशल मीडियावरील व्हीडिओ नेहमीच दीपिका-रणवीर मजामस्तीच्या मूडमध्येच असतात. ब-याचदा ही जोडी एकमेंकाच्या फोटो आणि व्हीडिओवरील कमेंट्समुळे चर्चेत असते. सध्या देखील रणवीरच्या एका कमेंटला दीपिकाने दिलेल्या रिप्लायमुळे हे दोघेही पुन्हा चर्चे आले आहेत. 

दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक क्लोजअप फोटो शेअर केला आहे. या फोटोवर रणवीरने 'और पास' अशी कमेंट केली असून यालाच रिप्लाय देत दीपिकानेही रणवीरला पत्नीच्या अंदाजात उत्तर दिले आहे. 'अच्‍छा, घर आजा, मैं बताती हूं' असा रिप्लाय दीपिकाने या फोटोला दिला आहे. दरम्यान दोघांच्या या कमेंन्ट्सना चाहत्यांनी देखील लाईक करत स्वत:च्या कमेंन्ट दिल्या आहेत.

रणवीर आणि दीपिका हे दोघेही आगामी  '83' या चित्रपटात एकत्र दिसणार असून हा चित्रपट भारताने 1982 साली क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता त्यावर आधारीत आहे. यातरणवीर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. तर दीपिका त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika takes husband Ranveer's class; Said 'come home, tell me'