'ब्रह्मास्त्र'चे स्ट्रीमिंग करण्यास १८ वेबसाईट्सना प्रतिबंध | Delhi High Court On Brahmastra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi High Court

'ब्रह्मास्त्र'चे स्ट्रीमिंग करण्यास १८ वेबसाईट्सना प्रतिबंध

Brahmastra Movie News : स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला अंतरिम दिलासा देत दिल्ली उच्च न्यायालयाने १८ संकेतस्थळांना आगामी बाॅलीवूड (Bollywood News) चित्रपट 'ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा'चे स्ट्रिमिंग आणि होस्टिंग करण्यास प्रतिबंध केले आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी दूरसंचार आणि इलेक्ट्राॅनिक्स मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान विभागांना आवश्यक नोटीस वेगवेगळ्या इंटरनेट सेवा पुरवठादारांना संकेतस्थळांचे अॅक्सेस ब्लाॅक करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा: Kangana Ranaut : कंगनाचा जावई शोध, महेश भट मुस्लिम असल्याचा केला दावा

पायरसीवर नियंत्रण तसेच कडक पावले उचलण्याची गरज आहे, असे उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले. काॅपीराईट प्रकरणी स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (Star India Private Limited) न्यायालयात धाव घेतली होती. स्टार इंडिया ही कंपनी चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रम निर्मितीसह वितरण करत असते. ही कंपनी चित्रपटाचा सहनिर्माता आहे.

Web Title: Delhi High Court Restrains Rogue Websites From Streaming Brahmastra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..