Money Laundering Case:जॅकलिनला पुन्हा समन्स,19 सप्टेंबरला EOW समोर हजर राहण्याचे आदेश

मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस विरोधात दिल्ली पोलिस कठोर पावलं उचलताना दिसत आहेत.
Delhi Police Summons jacqueline Fernandez to appear againg in EOW on 19 september
Delhi Police Summons jacqueline Fernandez to appear againg in EOW on 19 septemberGoogle
Updated on

Jacqueline Fernandez :मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस विरोधात दिल्ली पोलिस कठोर पावलं उचलताना दिसत आहेत. त्यामुळे जॅकलिनच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. जॅकलिनला पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जॅकलिनला आता १९ सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखा म्हणजे EOW समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Delhi Police Summons jacqueline Fernandez to appear againg in EOW on 19 september)

Delhi Police Summons jacqueline Fernandez to appear againg in EOW on 19 september
महाठग सुकेशसोबत नाव जोडल्यावर चाहतची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली,'योग्य वेळ आली की..'

याआधी जॅकलिनला १४ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं. यादरम्यान सुकेशसोबत जॅकलिनशी ओळख करुन देणारी पिंकी ईराणी देखील पोलिसांसमोर हजर राहिली होती. दोघींना एकमेकींसमोर बसवून कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर प्रकरणात सवाल-जवाब करण्यात आले.

Delhi Police Summons jacqueline Fernandez to appear againg in EOW on 19 september
बॉलीवूडच्या वेधानं डॉक्टरांनाही चुकीचं ठरवलं,कधीच डान्स-Action करू शकणार नव्हता हृतिक

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार,दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात चौकशीसाठी उद्या १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EOW) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आल्यानंतर तिला अनेकदा ईडीसमोर हजर रहावे लागले आहे. त्या चौकशीत सुकेश चंद्रशेखरने आपल्याला महागड्या भेटवस्तू गिफ्ट म्हणून दिल्या होत्या हे अभिनेत्रीनं मान्य केलं आहे. २०० करोड रुपयांची मोठी अफरातफर करणारा सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार जेलमध्ये बंद आहे आणि त्याच्या विरोधात १० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Delhi Police Summons jacqueline Fernandez to appear againg in EOW on 19 september
'त्या' मुलाखतीआधी ढसाढसा रडलेली प्रिया...

या प्रकरणात आतापर्यंत जॅकलिन,नोरा फतेही यांना आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी बोलावलं होतं. रिपोर्ट्सनुसार नोरा आणि जॅकलिनच नाही तर आणखी चार अभिनेत्रींची नावं यात सामिल आहेत. त्यानुसार निकिता तंबोली,चाहत खन्ना,सोफिया सिंग आणि अरुशा पाटील यांनी महाठग सुकेश चंद्रशेखरची जेलमध्ये जाऊन भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com