Chhapaak Trailer : 'कितना अच्छा होता अगर ऍसिड बिकताही नही तो...'

depika padukone Chhapaak movie Trailer is out
depika padukone Chhapaak movie Trailer is out

मुंबई : ब़ॉलिवूडनंतर थेट हॉलिवूडमध्ये झेप घेत दीपिकाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दीपिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरते. तिची फॅऩ फॉलोइंगही जास्त आहे.'पद्मावत' ती कोणत्य़ा नव्या चित्रपटामध्ये दिसली नाही. आता मात्र लग्नानंतरचा पहिला चित्रपट 'छपाक' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्य़ाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून इंटरनेटवरल तो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 

काल इन्स्टाग्रामवर दीपिकाने ट्रेलर प्रदर्शित होण्याची घोषणा केली आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली. अखेर त्य़ाचा ट्रेलर फॉक्स स्टारने यू ट्युबरवर अपलोड केला आहे.त्यामध्ये दीपिकाचा लुक आणि भूमिका थक्क करणारी आहे. दीपिकासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता विक्रांत मेसी दिसत आहे. ऍसिड हल्ल्याची शिकार ठरलेली लक्ष्मी अग्रवाल हिची बायोग्राफी या सिनेमामधून दिसणार आहे. ट्रेलर हा एकुणच रोमांचीत असून लक्ष्मीची सत्य कहाणी थक्क करणारी आहे. चित्रपटात दीपिका 'मालती' हे पात्र साकारताना दिसतेय. 

ऍसिड हल्ला, न्यायाचा लढा आणि त्यानंतरचं रोजचं आयुष्य जगण्याचा संघर्ष हे ट्रेलरमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये मालतीची प्रेमकथाही दाखविण्यात आलेय. चित्रपटातील डायलॉग हे जबरदस्त असून वास्तवाची जाणीव करून देणारे आहेत. ऍसिड हल्ला झाल्यावर मालती म्हणते, 'कितना अच्छा होता अगर ऍसिड बिकताही नही, मिलताही नही तो फेकताही नही'. ऍसिड हल्ल्यानंतर आरशात स्वत:चा चेहरा पाहिल्यानंतरची मालतीची किंकाळी हादरवून टाकणारी आहे. 

ही भूमिका आहे ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल या तरुणीची. लक्ष्मीच्या जीवनावर आधारीत 'छपाक' हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात लक्ष्मीची भूमिका दीपिकाने साकारली आहे. मेघना गुलजार या 'छपाक'चे दिग्दर्शन करत आहे. तर, दीपिका पदुकोन, फॉक्स स्टार स्टुडिओज, गोविंद सिंग संधू यांनी चित्रपटाचं निर्देशन केलं आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार आणि अतिका चौहान यांनी कथा लिहिली आहे.

लक्ष्मीच्या भूमिकेत स्वतःला जगासमोर आणताना दीपिका म्हणते, 'या चित्रपटात साकारत असलेली मालतीची भूमिका माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे.'
'मालती'च्या भूमिकेत दीपिकाचा चेहरा ऍसिड हल्ला झालेल्या तरुणीसारखाच दिसत आहे. ऍसिड हल्ला झाल्यानंतर लक्ष्मीने स्वतःला सावरत कशाप्रकारे संघर्ष केला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला हे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com