
बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असलेला पहायला मिळतो. केवळ तोच नाही तर त्याच्या जोडीला त्याची पत्नी जेनेलियाही त्याच्यासोबत वेगवेगळे व्हिडीओ रील पोस्ट करीत असते. सोशल मीडियावर आपण इतके सक्रिय का असतो? याचं कारणही मागे या दोघांनी स्पष्ट केलं होतं. ''कोरोनानं लोकांच्या आयुष्यात खूप दुःख आणलं आहे. लॉकडाऊन दरम्यान लोकं घरात राहून त्रासली होती. तेव्हा आपल्या माध्यमातून लोकांचं थोडंफार मनोरंजन करण्याच्या उद्देशानं आम्ही सोशल मीडियावर जमेल तसं व्हिडिओ पोस्ट करण्याचं ठरवलं. आणि आम्हाला आनंद आहे की लोकं आमचे व्हिडीओ पसंद करीत आहेत'',असं त्या दोघांनी सांगितलं होतं.
नुकताच रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यानं आपल्या शुटिंगच्या सेटवरील काही सहकाऱ्यांना एकत्र घेऊन बनवला आहे. त्याने व्हिडीओसाठी इन्स्टाग्रामवर असलेले Guess The Country हे फिल्टर वापरले आहे. यावेळी तिथे एक चेनचं चिन्ह असतं आणि त्याच्यापुढे A हे अक्षर असतं. तर यावेळी रितेश आणि त्याचे काही साथी हा कोणता देश असेल असं म्हणत अनेक देशांची नावं अंदाजानं घेताना दिसत आहेत.
त्यानंतर त्यांना कळते की तो देश तर चीन आहे. तेव्हा रितेश मात्र हजरजबाबीपणा दाखवत लगेच म्हणतो कसा,''ए कोरोना व्हायरस देणाऱ्या देशा' आणि त्याबरोबर लगेचच तिथे उपस्थित असलेले त्याचे सारे सहकारी जोरजोरात हसू लागतात. रितेश लवकरच आपल्याला अक्षय कुमारसोबत 'बच्चन पांडे' सिनेमात दिसणार आहे. त्याशिवाय तो एका मोठया मराठी सिनेमावरही काम करीत असल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.