Athiya-Rahul Wedding : अथिया आणि केएल राहूलच्या लग्नात जेवणाचा दक्षिणात्या पद्धतीचा थाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Athiya-Rahul Wedding

Athiya-Rahul Wedding : अथिया आणि केएल राहूलच्या लग्नात जेवणाचा दक्षिणात्या पद्धतीचा थाट

Athiya-Rahul Wedding : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आज 23 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. चला तर जाणून घेऊया या लग्नात कोणत्या पद्धतीची जेवणाची बैठक असणार आहे

हेही वाचा: Athiya-Rahul Wedding : खंडाळ्यात होतंय अथिया-राहुलचं लग्न, पाहा कसं आहे शेट्टी अण्णाचं शानदार फार्महाऊस

लग्नात अथिया आणि केएल राहुल हे जोडपे प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणार आहेत. ड्रेसच्या रंगाबद्दल बोलायचे झाल्यास, जोडपे पांढरे आणि सोनेरी पोशाख परिधान करणार आहेत .जेवणाबद्दल बोलायचे झाले तर लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना केळीच्या पानांवर जेवण दिले जाईल.या लग्नात दक्षिणात्या पद्धतीचा थाट असणार आहे. लग्नापूर्वी पूजा केली जाणार आहे . या दरम्यान सर्वांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Apple IPhone Discount : Apple iPhone 14 वर 10 हजारांची सूट, स्टॉक संपवण्यासाठी कंपनीची खास ऑफर ?

अथिया शेट्टी आणि केएल राहुलने एकत्र हळदी समारंभ साजरा केला. अथिया आणि केएल राहुलचे रिसेप्शन मुंबईत होणार आहे. यामध्ये बॉडीवुड आणि क्रिकेट जगतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी सामिल होणार आहेत.