मृत्यूची देवता....कंगनाच्या 'धाकड'चा जबरदस्त पोस्टर पाहिलात का?

सकाळ ऑनलाइन
Monday, 8 February 2021

१ ऑक्टोबर रोजी चित्रपट होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या बोल्ड स्टेटमेंट आणि हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. वेगवेगळ्या विषयांच्या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आसते. अशाच कंगणाच्या एका हटके चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे नाव 'धाकड' असून कंगना या चित्रपटात गुप्तहेराच्या भुमिकेत दिसणार आहे.

या पोस्टरमध्ये कंगना मशिनगन घेऊन उभी आहे. हा पोस्टर कंगनाने ट्विटरवर पोस्ट केला आहे. 'ते तिला अग्नी म्हणतात, पण मी तिच वर्णन मृत्यूची देवता.. भैरवी असं करेन' असं कॅप्शन कंगनाने या पोस्टरला दिले आहे. हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असून या पोस्टरमुळे कंगनाच्या चाहत्यांमध्ये उस्तुकता निर्माण झाली आहे. 

हेही वाचा : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; सिद्धार्थ-मितालीच्या नव्या फोटोची चर्चा

धाकड चित्रपटामध्ये कंगनासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्तादेखील दिसणार आहेत. या चित्रपटात कंगना गुप्तहेराच्या भूमिकेत आणि दिव्या दत्ता खलनायिकाच्या भुमिकेत दिसणार आहे. अर्जुन रामपाल हा रुद्रवीर नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे. 'हा चित्रपट फक्त माझ्या करिअरमधील नाही तर पूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील वेगळा चित्रपट आहे' असे कंगनाने या चित्रपटाबद्दल सांगितले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhaakad agni is my depiction of the goddess of death kangana ranaut dhakad movie poster realese