Dhanashree Verma Jhalak Dikhla Jaa: 'वहिनी आम्ही तुमच्या पाठीशी! चहलच्या पत्नीला धनश्रीला कोणकोणत्या क्रिकेटर्सचा मिळाला पाठींबा?

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री ही सध्या झलक दिखला जा च्या ११ (Dhanashree Verma In Jhalak Dikhla Jaa) व्या सीझनच्या फिनालेपर्यत जाऊन पोहचली आहे.
Dhanashree Verma
Dhanashree Verma esakal

Dhanashree Verma In Jhalak Dikhla Jaa: भारतीय क्रिकेटसंघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल हा नेहमीच (Dhanashree Verma ) चर्चेत असतो. त्याची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या व्हायरल रिल्सला नेटकऱ्यांचा जोरदार (Yuzvednra Chahal) प्रतिसाद मिळताना दिसतो. ती सध्या टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील झलक दिखला जा नावाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आहे.

युजवेंद्र चहलच्या पत्नीला त्या कार्यक्रमातून सपोर्ट करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडु पुढे आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर धनश्रीला शुभेच्छा देत आपला पाठींबा जाहीर केला आहे. ते क्रिकेटर कोण आहेत हे आपण पाहणार आहोत. (Dhanashree Verma Yuzvendra Chahal ) सध्या धनश्री ही झलक दिखला जा च्या अकराव्या सीझनमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिच्या परफॉर्मन्सला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

युजवेंद्रच्या मित्रांनी आता धनश्रीला फिनालेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डान्सर, (Dhanashree Verma In Jhalak Dikhla Jaa 11) कोरिओग्राफर्स आणि युट्युबर म्हणून धनश्रीनं आतापर्यत तिची वेगळी ओळख तयार केली आहे. काही दिवसांपूर्वी ती जखमीही झाली होती. मात्र तरीही तिनं त्या शो च्या फिनालेपर्यत धडक मारली आहे. धनश्रीला युजवेंद्रकडून मोठा सपोर्ट मिळताना दिसत आहे. अशात काही क्रिकेटरकडून देखील तिचं कौतुक होत आहे.

युजवेंद्रनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामध्ये त्यानं पत्नी धनश्रीला सपोर्ट केलं आहे. तो म्हणतो, तुला पुन्हा एकदा डान्स करताना पाहतो आहे याचा आनंद आहे. मला तुझा गर्व वाटतो. मला माहिती आहे की, तुझा गुडघा दुखावला आहे. तू शंभर टक्के फिट नाही. पण तरीही तू लढते आहेस याचा आनंद आहे. मी चाहत्यांना, प्रेक्षकांना आवाहन करतो की, त्यांनी धनश्रीला वोटिंग करावे.

Dhanashree Verma
Shatrughan Sinha : 'कित्येक मोठे हिरो माझ्यावर जळायचे म्हणून तर मला कधीही...', शत्रुघ्न सिन्हा काय बोलून गेले?

या व्हिडिओनंतर प्रसिद्ध किक्रेटपटू शिखर धवन, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज यांनी सोशल मीडियावर धनश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. सिराजनं म्हटलं आहे की, तुम्हाला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहून खूप आनंद वाटला. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. श्रेयस अय्यरनं म्हटलं आहे की, तुम्हाला पुन्हा डान्स करताना पाहून बरं वाटलं. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com