धनुषचा 'थिरुचित्रम्बलम' १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील, आमिर अन् अक्षयही.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanush Movie Thiruchitrambalam

धनुषचा 'थिरुचित्रम्बलम' १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील, आमिर अन् अक्षयही..

Dhanush Film Thiruchitrambalam Box Office Collection : दिग्दर्शक मिथरन आर जवाहर यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'थिरुचित्रम्बलम' या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत आहे. 'थिरुचित्रम्बलम' हा जगभरात १०० कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. मंगळवारी इंडस्ट्री ट्रॅकर राजशेखर यांनी ट्विट केले, धनुषच्या चित्रपटाने जगभरातील १०० कोटींच्या ग्रॉस क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

हा टप्पा गाठणारा त्याचा पहिला तमिळ चित्रपट आहे. ही फक्त सुरुवात आहे. बजेटमध्ये बनवलेले फिल गुड चित्रपटातून १०० कोटींची कमाई करणे सोपे नाही. जबरदस्त! उद्योगांवर लक्ष ठेवून असलेल्या नागनाथन यांनी ट्विट केले की 'तिरुचित्रम्बलम' हा तामिळनाडूमधील धनुषचा (Dhanush) पहिला ३० कोटी रुपयांचा शेअर चित्रपट म्हणून उदयास आला आहे.

हेही वाचा: 'माली'ची शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवासाठी निवड, निर्माती खूश

ते म्हणाले, की हा चित्रपट ब्लॉकबस्टर म्हणून पुढे आला आहे. आणखी एक इंडस्ट्री ट्रॅकर रमेश बाला यांनी ट्विट केले की 'थिरुचित्रम्बलम' ने (Thiruchitrambalam) यूएस बॉक्स ऑफिसवर रविवारपर्यंत (४ सप्टेंबर) ४ लाख ५३ हजार ९१८ डाॅलरची कमाई केली. (South Indian Film)

हेही वाचा: राज कुंद्रा टीव्ही विश्वात करणार पर्दापण, 'या' मालिकेत करणार काम?

त्याच कालावधीत ऑस्ट्रेलियन बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने २ लाख ३६ हजार ३३४ डाॅलरची कमाई केली. दरम्यान, धनुषने त्याचा मोठा भाऊ सेल्वाराघवन दिग्दर्शित त्याच्या आगामी 'नाने वरुवेन' चित्रपटाच्या कथानकाविषयी सूचक संकेत दिला.

Web Title: Dhanush Film Thiruchitrambalam Box Office Collection 100 Crore Club

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..