
धनुषचे हाॅलीवूडमध्ये पदार्पण, चित्रपट 'द ग्रे मॅन'चे होतेय कौतूक
धनुषचा पहिला हाॅलीवूड चित्रपट 'द ग्रे मॅन' (The Grau Man) २२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शनासाठी तयार आहे. प्रदर्शनापूर्वीच रविवारी अमेरिकेतील माध्यमांसाठी चित्रपटाचा विशेष स्क्रिनिंग करण्यात आले आहे. स्क्रिनिंगने पूर्ण चित्रपट आणि धनुषच्या (Dhanush) भूमिकेवरुन ज्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत, याचा अर्थ आपला आवडता अभिनेता हाॅलीवूड (Hollywood) चित्रपटात पाहून भारतीय जनतेला खूपच आनंद होणार आहे. (Dhanush In Hollywood Debut The Gray Man Says Critic Praise Film)
हेही वाचा: राखीला आला राग, फावडं घेऊन रिक्षाचा केला पाठलाग
हाॅलीवूड समीक्षकांनी धनुषचे केले कौतूक
प्रसिद्ध हाॅलीवूड समीक्षक कर्टनी होवार्डने 'द ग्रे मॅन' पाहिल्यानंतर ट्विटवर आपले परीक्षण शेअर केले. त्यांनी लिहिले, की चित्रपट ताकद, बंदुकीच्या गोळ्या आणि विट्सच एक युद्ध आहे. धनुषच्या सीन्सविषयी सांगताना त्या म्हणतात, धनुषचे सीन निर्दय आणि भडक आहेत. जेव्हा एका चाहत्याने कर्टनीला विचारले की चित्रपटात धनुषची भूमिका किती काळ आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिले, तो अल्पकाळ आहे, मात्र खूपच दमदार आहे. चित्रपटाचे कथानक आणि अॅक्शनमध्ये त्याची दमदार कामगिरी आहे.
हेही वाचा: काॅमेडियन वीर दासची पुन्हा जीभ घसरली; म्हणाला - देशात कोणालाही मारले...
स्क्रिनिंगनंतर माध्यमांशी वार्तालाप करताना जिंकले मन
'द ग्रेन मॅन' एक अॅक्शन थ्रिलर आहे. जसे अॅव्हेंजर्स : एंडगेम' (Avengers Endgame) सारखी चित्रपटे बनवलेल्या रूसो ब्रदर्सने (Russo Brothers) दिग्दर्शित केला आहे. १५ जुलै रोजी निवडक थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २२ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर त्याचे प्रिमियर होईल. चित्रपटात धनुषबरोबर कॅप्टन अमेरिकेची भूमिका करणारे क्रिस इवान्स (Chris Evans), टाॅप हाॅलीवूड सिनेतारकांपैकी एक रायन गाॅसलिंग आणि नुकतेच आलेल्या जेम्स बाँड चित्रपटात भूमिका केलेल्या एना डी अर्मससारखे दिग्गज कलाकार आहेत.
Web Title: Dhanush In Hollywood Debut The Gray Man Says Critic Praise Film
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..